“पुरस्कार स्वीकारू मात्र रक्कम नाही”; ‘गांधी शांतता सन्माना’नंतर गीता प्रेसने का घेतली ही भूमिका?..वाचा विस्ताराने

गोरखपूर – गोरखपूरमधील प्रकाशक गीता प्रेसने गांधी शांतता पुरस्कार स्वीकारू पण एक कोटीचे मानधन स्वीकारणार नाही, अशी भूमिका मांडली आहे. गीता प्रेसच्या संचालकांनी सोमवारी ही घोषणा केली. 18 जून रोजी केंद्र सरकारने गीता प्रेसला 2021 चा गांधी शांतता पुरस्कार जाहीर केला होता.
गीता प्रेसचे व्यवस्थापक लालमणी तिवारी म्हणाले की, “गीता प्रेसने 100 वर्षांत कधीही आर्थिक मदत किंवा देणगी घेतली नाही. याशिवाय पुरस्काराबरोबर मिळालेली कोणतीही रक्कम स्वीकारलेली नाही. हा सन्मान आमच्यासाठी आनंदाची बाब असली तरी, पुरस्काराबरोबरची रक्कम स्वीकारणार नाही.
हा निर्णय उपहासात्मक-कॉंग्रेस
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी एका ट्विटमध्ये पीएम मोदींच्या अध्यक्षतेखालील ज्युरीने दिलेला निकाल फसवणूक करणारा असल्याचे म्हटले आहे. हा निर्णय सावरकर आणि नथुराम गोडसे यांना पुरस्कार देण्यासारखा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी केले कौतुक
पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गीता प्रेसचे अभिनंदन केले. प्रेसच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करणे हे समाजसेवेतील कार्याचे कौतुक आहे, गांधी शांतता पुरस्कार 2021 द्वारे मानवतेच्या सामूहिक विकासासाठी गीता प्रेसने दिलेल्या महत्त्वपूर्ण आणि अद्वितीय योगदानाला पावती आहे, असे मोदी म्हणाले आहेत.
जगातील सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक
गीता प्रेसची स्थापना 1923 मध्ये झाली. ते जगातील सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक आहे. त्यांनी 14 भाषांमध्ये 417 दशलक्ष पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यापैकी 16.21 कोटी श्रीमद भगवद्गीता आहेत. गीता प्रेसने आतापर्यंत सनातन धर्माची 92 कोटी पुस्तके छापली आहेत, हा एक विक्रम आहे. याच वर्षी तब्बल 2 कोटी 42 लाख पुस्तके प्रकाशित केली आहेत. रामचरितमानस बाबतच्या राजकीय वादानंतर 50 हजार अधिक पुस्तकांची विक्री झाली आहे.





