अनन्या-आदित्य रॉय कपूरचं अफेअरबाबत चंकी पांडे म्हणाला, ‘माझ्यापेक्षाही जास्त पैसे कमवत…”

मुंबई – अनेक दिवसांपासून अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा आहे. दोघांना अनेकवेळा पार्ट्यांमध्ये एकत्र पाहण्यात आले होते. तेव्हापासून दोघेही त्यांच्या नात्याच्या अफवांमुळे चर्चेत आहे. पुन्हा एकदा आदित्य आणि अनन्या डिनर डेटवर एकत्र स्पॉट झाले होते.
आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांना आतापर्यंत अनेकदा सार्वजनिकरित्या एकत्र पाहण्यात आले. दरम्यान, हे जोडपे पुन्हा एकदा चर्चेत आले. आदित्य रॉय कपूर आणि अनाया पांडेचे व्हिडिओ इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाला होता.
अभिनेत्रीने तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूर सोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. त्याच्या नात्याचा खुलासा करत तिने शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये चाहत्यांना गोंधळात टाकणारा इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. अशात अनन्याच्या वडिलांनी यावर मौन तोडले आहे.
चंकी पांडे यांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले,’मला वाटतं हे ठीक आहे. ती २५ वर्षांची आहे, माझ्यापेक्षाही जास्त पैसे कमवत आहे. तिला जे करायचंय त्यासाठी ती स्वतंत्र आहे. २५ वर्षांच्या माझ्या मुलीला हे सांगायची माझी हिंमत कशी होईल की तिने काय करावं. मला त्यांच्या नात्याची काहीच अडचण नाही. मी हे हॉलिवूडमध्येही पाहिलं आहे. तुम्हाला हे स्वीकारावं लागतं.’ असं म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
नुकतीच अनन्या पांडे नेहा धुपियाच्या नो फिल्टर नेहा शोच्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती. या शोमध्ये नेहासह अभिनेत्रीने आशिकी २ अभिनेता आदित्यसोबतच्या तिच्या नात्याबद्दल खुलेपणाने सांगितले आहे. शोच्या प्रोमोमध्ये नेहाने अनन्याला तिच्या आणि आदित्यच्या नात्याबद्दल विचारल्याचे पाहायला मिळाले. यावर प्रतिक्रिया देताना अनन्या म्हणाली की ‘आम्ही दोघे फक्त मित्र नाही तर खूप चांगले मित्र आहोत’.





