BAN W vs PAK W : बांगलादेशी अख्तरच्या इनस्विंगपुढे बुमराह-स्टार्कही फिके; एकसारख्या चेंडूंवर दोन फलंदाजांना धाडलं तंबूत, पाहा VIDEO

पाकिस्तानच्या कर्णधार फातिमा सनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, बांगलादेशच्या युवा गोलंदाज मारुफा अख्तरने पहिल्याच षटकात आपल्या इनस्विंग गोलंदाजीने पाकिस्तानला मोठे धक्के दिले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मारुफा अख्तरच्या इनस्विंगने सलामीवीरांना भेदले –
Back to back incredible deliveries from Marufa to put Pakistan 2 down in the opening over 🙁 pic.twitter.com/n5gdgW654f
— PCT Replays 2.0 (@ReplaysPCT) October 2, 2025
क्रिकेटमध्ये डावखुऱ्या फलंदाजासाठी चेंडू आत येणे म्हणजे इनस्विंग. पुरुष क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह, कागिसो रबाडा आणि मिशेल स्टार्क यांच्या इनस्विंग गोलंदाजीची चर्चा असते. पण 20 वर्षीय बांगलादेशी गोलंदाज मारुफा अख्तरने आपल्या इनस्विंगने सर्वांचे लक्ष वेधले. पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर तिने पाकिस्तानची सलामीवीर ओमैमा सोहेलला शून्यावर बाद केले.
हेही वाचा – IND vs WI : मोहम्मद सिराजचा ऐतिहासिक पराक्रम! स्टार्कला मागे टाकत ठरला जगातील पहिला गोलंदाज
मारुफाने वाइड लाइनवरून टाकलेला चेंडू हवेत आत आला आणि ऑफ स्टंपच्या बाहेर पडल्यानंतर लेग स्टंपजवळ येत बेल्स उडवल्या. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर पाकिस्तानची प्रमुख फलंदाज सिदरा अमीनला तिने पुन्हा इनस्विंगवर बोल्ड केले. दोन्ही फलंदाजांना गोल्डन डकवर पॅव्हेलियनचा रस्ता धरावा लागला.
हेही वाचा – IND vs WI : मोहम्मद सिराजचा ऐतिहासिक पराक्रम! स्टार्कला मागे टाकत ठरला जगातील पहिला गोलंदाज
पाकिस्तानची खराब कामगिरी, 129 धावांत गारद
पाकिस्तानचा संपूर्ण संघ बांगलादेशच्या गोलंदाजांपुढे ढेपाळली आणि त्यांचा डाव 129 धावांत आटोपला. रमीन शमीमने सर्वाधिक 23 धावा केल्या, तर कर्णधार फातिमा सनाने 22 धावांचे योगदान दिले. बांगलादेशकडून शोर्ना अख्तरने तीन विकेट्स घेतल्या, तर मारुफा अख्तर आणि नाहिदा अख्तर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत पाकिस्तानला दडपणाखाली ठेवले.बांगलादेशच्या गोलंदाजांनी दाखवलेल्या या शानदार कामगिरीमुळे सामन्यावर त्यांचे वर्चस्व दिसून आले. आता बांगलादेशच्या फलंदाजांना ही धावसंख्या गाठून विजयी सुरुवात करायची आहे.





