RCB vs SRH : अभिषेक शर्माने केला ऐतिहासिक पराक्रम! ज्याच्या आसपास नाहीय एकही भारतीय खेळाडू

Abhishek Sharma complete 4000 runs in T20 cricket : आयपीएल २०२५ मध्ये, सनरायझर्स हैदराबादचा युवा फलंदाज अभिषेक शर्माने इतिहास रचला. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये असा विक्रम रचला आहे, जो यापूर्वी फक्त आंद्रे रसेलसारखा शक्तिशाली फलंदाजच करू शकला होता. अभिषेकने टी-२० क्रिकेटमध्ये ४ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये ४ हजार धावा करण्यासोबतच अभिषेकने एक मोठा विक्रमही केला.
अभिषेक शर्माने केला मोठा विक्रम –
अभिषेकने शर्माने १६६.०५ च्या स्ट्राईक रेटने ४००० धावा करण्याचा विक्रम केला. अभिषेकचा टी-२० क्रिकेटमधील सर्वात वेगवान स्ट्राईक रेट आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये ४ शतकेही झळकावली आहेत. त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे सनरायझर्सना अनेक सामने जिंकता आले आणि त्याला टीम इंडियाच्या संघातही स्थान मिळाले आहे.
अभिषेकने आंद्रे रसेलची केली बरोबरी –
The dream of every cricket got fulfilled ! 🥰🤩
Courtesy : Abhishek Sharma #RCBvSRH #IPL2025 #Orangearmy pic.twitter.com/hNgPxrpb3h
— SunRisers OrangeArmy Official (@srhfansofficial) May 23, 2025
अभिषेक शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये एक विशेष स्थान मिळवले आहे. आता त्याचे नाव आंद्रे रसेलसारख्या मोठ्या खेळाडूंसोबत घेतले जात आहे. त्याने किमान ४,००० धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेट १६० पेक्षा जास्त आहे. १७०.९३ च्या स्ट्राईक रेटसह फिन अॅलन या यादीत अव्वल स्थानावर आहे. आंद्रे रसेल १६८.८४ च्या स्ट्राईक रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. अभिषेक शर्मा १६६.०५ च्या स्ट्राइक रेटसह तिसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा – RCB vs SRH : अभिषेकच्या षटकाराने स्टेडियममध्ये तोडफोड, ‘या’ खेळाडूंना मिळणार ५ लाखांचे मोफत किट
या यादीत टिम डेव्हिड (१६०.९७) आणि कॉलिन डी ग्रँडहोम (१५५.६२) यांचाही समावेश आहे. या यादीत रसेलने सर्वाधिक ९,१७५ धावा केल्या आहेत. अभिषेक शर्माने आयपीएल २०२५ मध्ये सनरायझर्ससाठी १२ सामन्यांमध्ये ४८४ धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट २०४.२२ होता, जो या हंगामातील सर्वोच्च होता. त्याने ट्रॅव्हिस हेडसह अनेक विक्रम मोडले आहेत. यामध्ये आयपीएलमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्या (२८७/३) देखील समाविष्ट आहे. त्याच्या नावावर सर्वात जलद २०० धावा पूर्ण करण्याचा विक्रमही आहे.
२०१८ मध्ये आयपीएलमध्ये झाली होता निवड –
अभिषेक शर्माने २०१८ मध्ये पंजाब किंग्जकडून आयपीएलमध्ये खेळायला सुरुवात केली. पण त्याला फारशा संधी मिळाल्या नाहीत. २०२२ मध्ये, सनरायझर्सने त्याला ६.५ कोटी रुपयांना खरेदी केले. यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याने आयपीएलमध्ये ५१ सामन्यांमध्ये १,२३६ धावा केल्या आहेत. अभिषेकने २०२४ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी२० मध्ये पदार्पण केले.





