Abhishek Sharma Superstition : बसमधील ‘त्या’ सीटचा चमत्कार! अभिषेकने का बदलला आपला नंबर? रेकॉर्डब्रेक खेळीनंतर खुलासा
Abhishek Sharma superstition : अभिषेक शर्माने सामन्यानंतर आपल्या वादळी अर्धशतकानंतर एक मॅजिक ट्रिकच्या खुलासा केला आहे.

Abhishek Sharma superstition revealed : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात अविश्वसनीय कामगिरी करत ८ गडी राखून विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने दिलेले १५४ धावांचे आव्हान भारताने केवळ १० षटकांत पूर्ण केले. या सामन्यात अभिषेक शर्माने स्फोटक खेळीने सर्वांचे लक्ष वेधलं. या खेळीबद्दल बोलताना त्याने एक खास ट्रिक सांगितली.
अभिषेक शर्माचं ‘सीट’ कनेक्शन आणि रेकॉर्डब्रेक खेळी –
या विजयाचा खरा नायक ठरला तो सलामीवीर अभिषेक शर्मा. अभिषेकने केवळ १४ चेंडूत अर्धशतक ठोकून भारतासाठी दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला. त्याने २० चेंडूत नाबाद ६८ धावा कुटल्या.सामन्यानंतर अर्शदीप सिंगशी संवाद साधताना अभिषेकने एका रंजक ‘युक्ती’चा खुलासा केला.
अभिषेक बसमध्ये नेहमी मागून चौथ्या सीटवर बसतो. मागच्या सामन्यात त्याची सीट बदलली होती, तेव्हा तो पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे या सामन्यात त्याने पुन्हा त्याच ठराविक सीटवर बसण्याची काळजी घेतली आणि मैदानात धावांचा पाऊस पाडला.
After that duck in the 2nd T20 against New Zealand, Abhishek Sharma changed his usual spot on the team bus and sat somewhere else.
After changing his seat, bro went on to smash 68 off just 20 balls 😭
Bro really believes in superstitions. pic.twitter.com/rhDinfZQfm
— GillTheWill (@GillTheWill77) January 26, 2026
सूर्या आणि इशानची फटकेबाजी –
अभिषेक शर्माने त्याची अंधश्रद्धा उघड केली
अभिषेक शर्माला कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इशान किशनने मोलाची साथ दिली. इशानने १३ चेंडूत २८ धावांची स्फोटक सुरुवात दिली. त्यानंतर कर्णधार सूर्याने २६ चेंडूत नाबाद ५७ धावा करत संघाला विजयापार नेले. त्याने फिरकीपटूंविरुद्ध जबरदस्त फटकेबाजी केली.
गोलंदाजी-क्षेत्ररक्षणातही चमकदार कामगिरी –
बॅटिंगआधी भारतीय गोलंदाजांनी किवींना १५३ धावांत रोखले. रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षणात हार्दिक पंड्या आणि रवी बिश्नोई यांनी टिपलेल्या चित्तथरारक झेलमुळे न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताच्या या सांघिक कामगिरीमुळे गुवाहाटीत टीम इंडियाचा तिरंगा डौलाने फडकला.





