Abhishek Sharma : अभिषेक शर्माने रचला इतिहास! सामना न खेळताच बनला नंबर वन

Abhishek Sharma creates history in ICC T20 Rankings : बुधवारी, आयसीसीने आपली नवीन क्रमवारी जाहीर केली, ज्यामध्ये अनेक खेळाडूंना फायदा झाला, तर काहींना नुकसान झाले. टी-20 क्रमवारीत भारतीय सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने कमाल केली. त्याने पहिल्या स्थानावर मजल मारली आणि यासह त्याने इतिहास रचला. अभिषेक शर्माच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला गेला. यासह तो अव्वल स्थानी पोहोचणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी विराट-सूर्याने अव्वल क्रमांक पटकावला होता.
अभिषेक शर्माने केला मोठा पराक्रम-
अभिषेक शर्मा आयसीसी टी-20 फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तो टी-20 फलंदाजी क्रमवारीत पहिले स्थान मिळवणारा सर्वात कमी वयाचा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने वयाच्या 24 वर्षे आणि 328 दिवसांत हा पराक्रम केला. यापूर्वी इतक्या कमी वयात कोणत्याही भारतीय खेळाडूला टी-20 स्वरूपात आयसीसी फलंदाजी क्रमवारीत पहिले स्थान मिळाले नव्हते. पण अभिषेकने ही कामगिरी करून दाखवली.
Topping the charts 🔝 😎
Congratulations to Abhishek Sharma, who becomes the Number One batter in ICC Men’s T20I rankings 👏👏#TeamIndia | @IamAbhiSharma4 pic.twitter.com/dKlm5UVsyv
— BCCI (@BCCI) July 30, 2025
Virat Kohli, Suryakumar Yadav, and Abhishek Sharma.
The southpaw has become the third Indian batter to reach the 🔝 spot in the ICC Men’s T20I batting rankings 📈#AbhishekSharma #TeamIndia pic.twitter.com/h8gz7hIwvk
— Circle of Cricket (@circleofcricket) July 30, 2025
सचिन तेंडुलकरने कसोटी आणि वनडेमध्ये भारताकडून हा पराक्रम केला आहे. सचिन, वयाच्या 21 वर्षे आणि 212 दिवसांचा असताना, आयसीसी टेस्ट फलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता. तो असा करणारा सर्वात कमी वयाचा भारतीय फलंदाज ठरला. त्याचप्रमाणे, 22 वर्षे आणि 311 दिवसांचा असताना, त्याने आयसीसी वनडे फलंदाजी क्रमवारीत पहिला क्रमांक मिळवला आणि हा विक्रमही त्याने सर्वात कमी वयात केला. हे दोन्ही विक्रम आजही कायम आहेत.
हेही वाचा – IND vs ENG : इंग्लंड संघाला मोठा धक्का! बेन स्टोक्स पाचव्या कसोटीतून बाहेर, पाहा प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा याने एकही सामना न खेळता आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे. सध्या त्याची रेटिंग 829 आहे. अभिषेकने कोणताही सामना न खेळता अव्वल स्थान मिळवल्याची गोष्ट खरी आहे. याचं कारण म्हणजे ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड याची रेटिंग कमी झाली आहे. यापूर्वी ट्रेव्हिस हेड पहिल्या क्रमांकावर होता, पण आता तो दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. हेडची रेटिंग आता 814 झाली आहे.





