Abhishek ghosalkar firing। राज्यात दोन दिवसापूर्वी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नारोन्हाने गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यातील मॉरिसच्या बॉडीगार्ड ला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने अमरेंद्र मिश्राला 13 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली. गुन्हे शाखेने मॉरिस नोरोन्हाचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राला अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी अटक केली होती. याच अमरेंद्र मिश्राच्या बंदुकीतून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्याला गुन्हे शाखेने अटक केली होती. अमरेंद्र मिश्राला 13 फेब्रुवारीपर्यंत कोठडी Abhishek ghosalkar firing। पोलिसांकडून कालपासून अमरेंद्र मिश्रा याची चौकशी सुरु आहे. मिश्राला शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी त्याची चौकशी करण्यासाठी सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. यानंतर न्यायालयाने त्याला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. हेही वाचा Firing Case: माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासासाठी पोलिसांची दोन पथके स्थापन मुझे फसाया गया है’ Abhishek ghosalkar firing। अमरेंद्र मिश्र याने न्यायालयातून बाहेर पडत असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. सुनावणीनंतर पोलिसांनी मिश्रा याला बाहेर गाडीत आणून बसवले. तेव्हा अमरेंद्र मिश्राने गाडीतूनच ओरडून म्हटले की, ‘मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ गलत हुआ है. मुझे फसाया गया है’. असे ओरडत बाहेर आला. यानंतर अमरेंद्र मिश्रा आणखी काही बोलण्यापूर्वी पोलिसांनी त्याला शांत बसवून गाडी पुढे नेली. अमरेंद्र मिश्रा याच्या या वक्तव्यानंतर आता अभिषेक घोसाळकर मृत्यूप्रकरणाला कोणते नवे वळण लागते का,? हे पाहणे गरजेचे आहे. हेही वाचा हृदय पिळवटून टाकणारी दृश्य! घोसाळकरांच्या पत्नी अन् मुलीने फोडला हंबरडा…