Abhinay Berde : अभिनय बेर्डेचा करिअरमधून ब्रेक! निर्णयामागचे कारणही सांगितले…
Abhinay Berde : चाहत्यांकडे मागितली मदत

Abhinay Berde : दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केले. यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या अभिनयाचे अनेकांकडून कौतुकही झाले. मात्र अलिकडेच त्याने सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेअर करत अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेत असल्याचे सांगितले आहे.
अभिनय बेर्डेने ‘मी करिअरमधून ब्रेक घेतोय. पुढच्या प्रवासासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. कारण जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की कमेंट करा,’ असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
अभिनयने करिअरमधून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला असून स्वतःचं स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं आहे. मात्र, त्याच्याकडे अद्याप स्टार्टअपची ठोस कल्पना नसल्याने त्याने चाहत्यांकडे मदत मागितली आहे.
View this post on Instagram
अभिनयचे चाहत्यांना आवाहन
अभिनयने व्हिडीओ शेअर करत सांगितले की, “आज व्हिडीओ बनवण्याचं कारण खूप वेगळं आहे आणि महत्त्वाचं आहे. मी माझ्या करिअरपासून जरा ब्रेक घ्यायचं ठरवलं आहे. हा ब्रेक यासाठी आहे कारण, मला माझं स्वत:चा स्टार्टअप सुरू करायचा आहे. त्यासाठी मला काही नव्या संकल्पना हव्या आहेत. त्यामुळे मला तुमची मदत लागणार आहे. जर, तुमच्याकडे Out Of The Box काही क्रेझी संकल्पना असतील तर, कमेंट्समध्ये मला नक्की कळवा.” असं आवाहन अभिनयने त्याच्या चाहत्यांना केलं आहे.
यावर त्याच्या बहिणीने म्हणजेच स्वानंदी बर्डेने यावर “ब्रो फक्त माझ्यामध्ये गुंतवणूक कर”, अशी मजेशीर कमेंटही केली आहे. अनेकांनी अभिनयला कमेंट्समध्ये संकल्पना सांगण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, अभिनयने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाशिवाय तो ‘मन कस्तुरी रे’, ‘अशी ही आशिकी’, ‘बॉइज 4’, ‘दशावतार’, ‘उत्तर’ अशा सिनेमांमध्ये काम केले आहे.
हेही वाचा :
Raju Patil : “अडीच वर्षांनंतर मी पुन्हा आमदार होणार”; मनसे नेते राजू पाटलांनी व्यक्त केला विश्वास





