Maharashtra Politics : महायुतीत मोठा स्फोट! भाजप शिवसेनेला संपवत आहे, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; अब्दुल सत्तारांचा थेट हल्ला
Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता पूर्णपणे चव्हाट्यावर आली आहे.

Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा महायुतीच्या जागावाटपात भाजपला सुटली असून, भाजपने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. (Maharashtra Politics)
मात्र, या निर्णयाला धुडकावून लावत शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यानंतर अब्दुल सत्तार यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केल्याने महायुतीमधील अंतर्गत युद्ध चव्हाट्यावर आले आहे. (Maharashtra Politics)
माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी आक्रमक भाषेत भाजपवर प्रहार केला. सत्तार यांनी म्हटले की, शिवसेनेचे मुंडके उडवण्याचे काम आपला मित्रपक्षच करत आहे. आमचा त्याग गुवाहाटीतील कामाख्या देवीला माहिती आहे, पण भाजप तो त्याग आता पूर्णपणे विसरली आहे. (Maharashtra Politics)
भाजप आमच्या पक्षात गटतट पाडत आहे. त्यांनी आमचे हातपाय आधीच तोडले होते, आता थेट मुंडकेच तोडून टाकले आहे. आमची जिल्हा परिषद गेली, महापालिकेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून असणारी सत्ताही संपली, आता आमच्याकडे राहिले काय? अनेक छोट्या जागांवर वैयक्तिक भाजपचे नेते मोठे होत आहेत आणि शिवसेनेला संपवले जात आहे. (Maharashtra Politics)
ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, असे विधान केले आहे. याबाबत विचारले असता सत्तार म्हणाले, मलाही वाटते की आता दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या पाहिजेत. (Maharashtra Politics)
आमच्या नेत्यांनी, म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तर कोणालाही विचारण्याची गरज उरणार नाही. माझा नेता जो निर्णय घेईल, तो मला पूर्णपणे मान्य असेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Maharashtra Politics)
जिल्ह्यात शिवसेनेत दोन भाग करून एका भागाला हाताशी धरायचे आणि दुसऱ्यावर अन्याय करायचा. अशी खेळी खेळून जर आमचा मोठा भाऊ आम्हालाच संपवणार असेल, तर आमच्याकडे दुसरा इलाज नाही, असा संताप त्यांनी यावेळी व्यक्त केला. (Maharashtra Politics)





