AB de Villiers : ‘जर आरसीबी फायनलमध्ये पोहोचली, तर मी…’, एबी डिव्हिलियर्सचं RCBच्या चाहत्यांना मोठं आश्वासन

AB de Villiers Promises to RCB Fans For IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या उर्वरित हंगामाला आज आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्याने सुरुवात होत आहे. हा सामना आरसीबीच्या होमग्राऊंडवर खेळला जाणार आहे. यंदाचा हंगामात आरसीबीने संघाने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे या संघाला जेतेपदाचा दावेदार मानले जात आहे. तत्पूर्वी विराट कोहलीचा माजी सहकारी आणि चांगला मित्र एबी डिव्हिलियर्सने आरसीबी चाहत्यांना एक मोठे आश्वासन दिले आहे. काय आश्वासन दिले आहे? जाणून घेऊया.
एबी डिव्हिलियर्सने काय दिले आश्वासन?
एबी डिव्हिलियर्सने म्हटले आहे की, जर आरसीबीचा संघ आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीत पोहोचला, तर तो स्टेडियममध्ये असेल आणि विराट कोहलीसोबत तो ट्रॉफी उचलेल. आरसीबी आपल्या ट्रॉफीची खूप दिवसांपासून वाट पाहत आहे. पण या हंगामात असे दिसते की बंगळुरूचा संघ पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकू शकेल. कारण आरसीबीने ११ पैकी ८ सामन्यात विजय मिळवून १६ गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी फक्त एक विजय आवश्यक आहे.
एबी डिव्हिलियर्स काय म्हणाला?
🚨 ABD IS COMING TO INDIA. 🚨
AB De Villiers said, “if RCB makes it to the Final, I’ll be there at the stadium. Nothing will give me more pleasure than to lift that trophy with Virat Kohli. I’ve tried that for many many years (smiles)”. pic.twitter.com/XSR5EmpaJv
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 17, 2025
एबी डिव्हिलियर्सने इंस्टाग्राम लाईव्ह सत्रादरम्यान सांगितले की, “जर आरसीबी संघ अंतिम फेरीत पोहोचला, तर मी संघाच्या खेळाडूंसह स्टेडियममध्ये उपस्थित राहीन असे मी वचन देतो. विराट कोहलीसोबत ट्रॉफी उचलण्यापेक्षा मला जास्त आनंद इतर कोणत्याही गोष्टीचा असणार नाही. मी अनेक वर्षांपासून हे करण्याचा प्रयत्न करत आहे.” एबी डिव्हिलियर्सने फलंदाज म्हणून विराट कोहलीसोबत अनेक वेळा ही ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु ते जेतेपदापासून दूर राहिले. दोघांनी संघाला अंतिम फेरीतही पोहोचले होते, पण त्यांना संघाला जेतेपद पटकावून देता आले नाही.
हेही वाचा – Shreyas Iyer : परदेशी खेळाडूंच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यरने जिंकली सर्वांची मनं! VIDEO होतोय व्हायरल
आयपीएल २०२५ बद्दल बोलायचे तर, आरसीबीने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत, त्यापैकी ८ सामने संघाने जिंकले आहेत. संघाने तीन सामने गमावले आहेत, या संघाच्या खात्यात १६ गुण आहेत आणि ते बऱ्याच काळापासून पॉइंट्स टेबलमध्ये टॉप २ मध्ये आहेत. संघाचा नेट रन रेटही मजबूत आहे. या हंगामात आरसीबीने घराबाहेर एकही सामना गमावलेला नाही. तथापि, आयपीएल २०२५ पुढे ढकलल्यामुळे संघ संयोजन विस्कळीत होऊ शकते.





