Aashadhi Wari 2023 : दिवे घाटात घुमला विठुमाऊलीचा गजर..! वारीचा कठीण टप्पा माऊलींनी केला पार

पुणे – संपूर्ण देशभरात विशेषतः महाराष्ट्रात विना आमंत्रित असणारा भक्तिमय अद्वितीय असा लक्षणीय संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा हा दि. 11 जून रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान झाला आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भावी अलंकापुरी नगरीत दाखल होतात व दुसऱ्या दिवशी लाखोंच्या संख्येने हरिनामाचा गजर करीत सोहळा पंढरीकडे मार्गस्थ होतो. यंदा या सोहळ्यात भाविकांची संख्या ही लक्षणीय असल्याची दिसून येत आहे.
पालखी सोहळा दि. 12 जून रोजी आळंदीहून पुणे मुक्कामी राहील. त्यानंतर आज दि. 14 रोजी पहाटे सासवडकडे प्रस्थान ठेवेल. दि. 15 रोजी पालखीचा मुक्काम सासवड येथेच राहिल. आणि त्यानंतर दि. 16 रोजी जेजुरीत मुक्काम असणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा माऊलींची पालखी पांडुरंगाची भेट घेण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.
आज माउलींच्या पालखीने टाळ मृदुंगावर ठेका धरत सगळ्या महत्वाचा आणि कठीण टप्पा पार केला. हे वारकऱ्यांनी भर ऊन्हात विठुनामाचा गजर करत दिवे घाट पार केला आहे. लाखो वारकऱ्यांमुळे दिवेघाटात विंहंगम दृष्य़ पाहायला मिळालं. सध्या सगळीकडे दिवेघाटातील हे नयनरम्य दृश्य व्हायरल होताना दिसत आहे.





