पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाला आप घालणार घेराव
Updated On:

नवी दिल्ली -आपने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ व्यापक निदर्शनांचे सूतोवाच केले आहे. निदर्शनांचा भाग म्हणून २६ मार्चला पंतप्रधान निवासस्थानाला घेराव घातला जाणार आहे.
उद्या (शनिवार) आपचे नेते, कार्यकर्ते आणि इंडिया आघाडीचे प्रतिनिधी दिल्लीत लोकशाही वाचवण्याची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये २४ मार्चला आपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाणार आहे.
यंदा होळी साजरी न करण्याचा निर्णय आपने घेतला आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करून आगामी काळात संयुक्त निदर्शने करण्याचाही त्या पक्षाचा विचार आहे.





