Parliament Session : ‘हा’ पक्ष वगळता विरोधकांचा संसद कामकाजावरील बहिष्कार मागे

नवी दिल्ली – अदानी घोटाळा प्रकरणात विरोधकांनी गेले तीन दिवस संसदीय कामकाजावर विरोधकांनी बहिष्कार घातला होता. तथापि आता त्यातील आम आदमी पक्ष वगळता बहुतांशी पक्षांनी आपला बहिष्कार मागे घेऊन कामकाजात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात मंगळवारी समविचारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश, यांनी सांगितले की आम्ही कामकाजात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असला तरी अदानींच्या महाघोटाळ्याच्या जेपीसी चौकशीची मागणी पुढे रेटण्याची भूमिका कायम ठेवणार आहोत.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/indian-army-is-ready-to-give-a-befitting-reply-if-china-fires-in-ladakh-sector-lt-gen-upendra-dwivedi/
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन यावर्षी 31 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संयुक्त अभिभाषणाने सुरू झाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2023-24 चा अर्थसंकल्प सादर केला. तेव्हापासून अदानी मुद्द्यावरून सुरू असलेल्या गोंधळामुळे संसदेत कामकाज झालेले नाही.





