Aanchal-Saksham Case : आंचलच्या आरोपांना सक्षमच्या आईचं प्रत्युत्तर; थेट चॅटिंगच दाखवलं, बोल ना बाळा…
Aanchal-Saksham Case : नांदेडमधील गाजलेल्या सक्षम ताटे हत्याकांडानंतर पुन्हा एकदा या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे.

Aanchal-Saksham Case : नांदेडमधील गाजलेल्या सक्षम ताटे हत्याकांडानंतर पुन्हा एकदा या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. सक्षमची प्रेयसी आंचल मामिडवार हिने सक्षमच्या लहान भावावर गैरवर्तनाचे गंभीर आरोप केल्यानंतर आता सक्षमच्या आईने माध्यमांसमोर येत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. इतकेच नव्हे, तर आंचल आणि सक्षमच्या भावामधील मोबाईल चॅट दाखवत त्यांनी आपल्या मुलावरचे आरोप निराधार असल्याचा दावा केला आहे. (Aanchal-Saksham Case)
आंचलने काय आरोप केले होते?
सक्षमच्या हत्येनंतर काही महिने त्याच्या कुटुंबासोबत राहिल्यानंतर आपण घर सोडल्याचे सांगताना आंचलने गंभीर आरोप केले होते. सक्षमचा लहान भाऊ जाणीवपूर्वक आपल्याला स्पर्श करत होता, त्याच्या वागणुकीबद्दल आपण सक्षमच्या आईला सांगितले; मात्र कुटुंबीयांनी विश्वास ठेवला नाही, असा दावा आंचलने केला. पुढे काही अनुचित घडले असते, तरीही माझ्यावर विश्वास ठेवला गेला नसता, म्हणूनच मी घर सोडल्याचे तिने स्पष्ट केले. (Aanchal-Saksham Case)
सक्षमच्या आईने दाखवले चॅट (Aanchal-Saksham Case)
आंचलच्या आरोपांनंतर सक्षमच्या आईने माध्यमांशी संवाद साधत आपल्या दुसऱ्या मुलावर करण्यात आलेले आरोप फेटाळले. “आमचं एक लेकरू आधीच गेलं आहे. आता दुसऱ्या मुलालाही बदनाम करू नये,” अशी भावनिक विनंती त्यांनी केली. (Aanchal-Saksham Case)
यावेळी त्यांनी आंचल आणि सक्षमच्या भावामधील मोबाईल चॅटही दाखवले. त्यामध्ये आंचलकडून “बोल ना बाळा…” अशा स्वरूपाचे संदेश पाठवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या चॅटवरून दोघांमध्ये नियमित संवाद होत असल्याचे दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले. (Aanchal-Saksham Case)![]()
‘तो तिला वहिनी म्हणायचा’
सक्षमच्या आईच्या मते, त्यांचा मुलगा आंचलला नेहमी “वहिनी” म्हणूनच संबोधायचा आणि तिच्याशी आदराने वागत होता. त्यामुळे त्याच्यावर करण्यात आलेले गैरवर्तनाचे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. (Aanchal-Saksham Case)
दरम्यान, आंचलच्या आरोपांनंतर आणि सक्षमच्या आईने चॅट सार्वजनिक केल्यानंतर या गाजलेल्या प्रकरणात नवा वाद निर्माण झाला असून, दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी दावे करण्यात येत आहेत. या आरोपांची सत्यता संबंधित तपास आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारेच स्पष्ट होऊ शकते. (Aanchal-Saksham Case)





