“आता सलमाननेही गौरी शोधली पाहिजे?” या प्रश्नावर आमिर खानचे मजेशीर उत्तर

Salman khan And Amir Khan | अभिनेता आमिर खानने दोन घटस्फोट झाल्यानंतर नव्या रिलेशनशिपची कबुली दिली. वयाच्या ६०व्या वर्षी आमिर खान तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची ओळख करून दिली. शाहरुख खानच्या पत्नीचं नाव देखील गौरी खान आहे. आता आमिर खानच्या गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट नाव आहे. मात्र बॉलिवूडचा तिसरा खान म्हणजेच सलमान खान वयाच्या 60 व्या वर्षीही बॅचलर आहे. अलिकडेच आमिरने सलमानच्या लव्ह लाईफबद्दल सांगितले.
आमिर खानला खास मित्र सलमान खान याच्या खासगी आयुष्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. सलमान खान लवकरच 60 वर्षांचा होणार आहे. पण अद्यापही तोअविवाहित आहे. एका पत्रकाराने आमिर खानला सलमानच्या लग्नाबद्दल विचारलं. ‘शाहरुख खान याच्याकडे एक गौरी आहे. तुझ्याकडे देखील एक गौरी आहे. आता सलमान देखील….’ यावर आमिर खान म्हणाला, ‘आता सलमान खानला देखील गौरी भेटली पाहिजे…’
पापाराझींनी आणखी एक प्रश्न विचारला की, तो आणि शाहरुख सलमानला सेटल होण्यासाठी काही टिप्स देतो का? यावर आमिर म्हणाला, “सलमान त्याच्यासाठी जे चांगले असेल तेच करेल.” आमिरने त्याची गर्लफ्रेंड गौरीचीही सलमान आणि शाहरुखशी ओळख करून दिली आहे. Salman khan And Amir Khan |
कोण आहे गौरी स्प्रॅट?
आमिर खान याची नवीन गर्लफ्रेंड विवाहित असून तिचा घटस्फोट झाला आहे. गौरीला एक मुलगा देखील आहे. सध्या ती आपल्या मुलासह बेंगळुरूमध्ये राहते. गौरी एका प्रोडक्शन हाऊसमध्येही काम करते.अमीर गौरीला गेल्या 25 वर्षांपासून ओळखतो. पण त्यांच्या रिलेशनशिपला दीड वर्षांपूर्वी सुरुवात झाली. आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता असून त्यांना आयरा-जुनैद ही दोन मुले आहेत आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव होती. त्यांना एक मुलगा आहे. मात्र आता आमिर त्याच्या दोन्ही पत्नींपासून विभक्त झाला आहे.
हेही वाचा:
“मोहम्मद अली जिना सारखे राहुल गांधींचे स्वप्न” ; आचार्य प्रमोद कृष्णम यांची सडकून टीका





