“मोहम्मद अली जिना सारखे राहुल गांधींचे स्वप्न” ; आचार्य प्रमोद कृष्णम यांची सडकून टीका

Pramod Krishnam on Rahul Gandhi । माजी काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. प्रमोद आचार्य यांनी “मोहम्मद अली जिना यांनी जे स्वप्न पाहिले होते, तेच स्वप्न आता राहुल गांधी पाहत आहेत. हे लोक दुसरा पाकिस्तान निर्माण करू इच्छितात” असा आरोप त्यांनी केला आहे.
प्रमोद कृष्णम यांची ही टिप्पणी संजय राऊत यांच्या शिवसेनेच्या मुखपत्र ‘सामना’मधील लेखानंतर आली आहे. सामनामध्ये संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारांवर भारताला हिंदू-पाकिस्तान बनवल्याचा आरोप केला होता. राऊत यांनी लिहिले होते की, “ज्या तत्त्वावर जिन्नांनी पाकिस्तानची निर्मिती केली, त्याच तत्त्वावर आता भाजप हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करत आहे आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे हिंदू-पाकिस्तानमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करत आहे.” असा आरोप केला आहे.
‘उद्धव ठाकरे राहुल गांधींसोबत राहतात…’ Pramod Krishnam on Rahul Gandhi ।
प्रमोद कृष्णम यांना संजय राऊत यांच्या या टिप्पणीबद्दल त्यांचे मत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी संजय राऊत यांच्यावर दुसरा पाकिस्तान निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यांनी राऊतांसह राहुल गांधींवरही निशाणा साधला. ते म्हणाले, ‘१९४७ मध्ये मोहम्मद अली जिना यांचे भारताचे विभाजन करण्याचे स्वप्न होते. संजय राऊत राहुल गांधींसोबत असेच स्वप्न पाहत आहेत. राहुल गांधींसोबत राहिल्याने, राहुल गांधींचा राहू उद्धव ठाकरेंच्या कुटुंबावर आणि पक्षावर आला आहे.
‘संजय राऊत दुसरा पाकिस्तान निर्माण करू इच्छितात’ Pramod Krishnam on Rahul Gandhi ।
प्रमोद आचार्य म्हणाले, ‘संजय राऊत राहुल गांधींसोबत मिळून हा देश तोडण्याचा कट रचत आहेत कारण त्यांना कळले आहे की भारतातील लोक त्यांचा हेतू समजून घेतात आणि ते पुन्हा कधीही त्यांना पाठिंबा देणार नाहीत.’ म्हणूनच त्यांना दुसरे पाकिस्तान निर्माण करायचे आहे आणि ते राहुल गांधींना या पाकिस्तानचे पंतप्रधान बनवू इच्छितात.” असे म्हटले आहे.





