‘कुली’ चित्रपटात रजनीकांत आणि आमिर खान दिसणार एकत्र

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान आणि साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांनी 30 वर्षांपूर्वी टेरर हाय टेरर या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. जुही चावलानेही यात दमदार अभिनय केला होता.
या चित्रपटानंतर चाहत्यांनी आमिर आणि रजनीकांत यांना कधीही पडद्यावर एकत्र पाहिले नाही. पण आता चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार असल्याचं दिसत आहे. हे दोन सुपरस्टार ‘कुली’ चित्रपटात एकत्र काम करणार असून आता पुन्हा एकदा पडद्यावर खळबळ माजवणार आहेत.
रजनीकांतच्या चित्रपटात आमिर खानचा कॅमिओ करणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. लोकेश कनगराज दिग्दर्शित, हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये बनवला जात आहे आणि हा बहुप्रतिक्षित तमिळ चित्रपटांपैकी एक आहे. आमिर या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये सामील झाल्याची बातमी त्याच्या चाहत्यांसाठी आश्चर्यचकित करणारी आहे. एका अहवालात म्हटले आहे की अभिनेता एक विशेष कॅमिओ करणार आहे.
दरम्यान, कुली हा चित्रपट 2025 साली प्रदर्शित होणार आहे. जुलैमध्ये हैदराबादमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. रिलीजची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. पण 2025 मध्ये तो रिलीज होऊ शकतो असे बोलले जात आहे. आमिर आणि रजनीकांत इतर प्रोजेक्ट्समध्येही काम करत आहेत.
जेनेलिया डिसूजा आमिरच्या ‘सीतारे जमीन पर’मध्ये झळकणार आहे. ‘चॅम्पियन’ या स्पॅनिश चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. रजनीकांत यांच्याकडे वेट्टायन आहे, ज्याचे दिग्दर्शन टीजे ज्ञानवेल करणार आहेत.





