आला रे आला… ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ओंकार भोजनेचे दमदार कमबॅक; चाहतेही आनंदी

Omkar Bhojane : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील सर्वच आपल्या दमादार विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांची संपूर्ण महाराष्ट्रात क्रेझ पाहायला मिळते. मात्र ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ चा भाग असलेला विनोदवीर ओंकार भोजनेने (Omkar Bhojane) अचानक या कार्यक्रमातून बाहेर पडला होता. त्यामुळे चाहते देखील नाराज झाले होते. पण आता या कार्यक्रमात पुन्हा एकदा ओंकारची एंट्री झाली आहे.
ओंकारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये कमबॅक केले आहे. आता पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना हसवण्यासाठी ओंकार भोजने सज्ज झाला आहे. नुकताच सोनी मराठीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे. ज्यात ओंकारला पाहून चाहते आनंदी झाले आहेत.
View this post on Instagram
सोनी मराठीने हा प्रोमो शेअर करत कॅप्शनमध्ये, ‘हास्यजत्रेत पुन्हा एकदा ओंकार भोजनेची धमाल… पाहा, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सहकुटुंब हसू या! – दिवाळी स्पेशल. शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठी वाहिनीवर.’, असे लिहिले आहे.
या प्रोमोमध्ये ओंकार भोजने म्हणतो की ‘मला वाटलं तर मी येतो नायतर येत पण नाय…, कधी नव्हे एकदा आलोय तर सगळंच माझ्यावर देऊ नका,’ असा डायलॉग बोलताना दिसत आहे. त्याचा हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यानी देखील कमेन्ट करत ‘आला रे आला ओंकार आला, अभी आयेगा मजा, आता हास्यजत्रा पुन्हा बघण्यास सुरू करणार, तुला आम्ही खूप मीस केलं, अब आयेगा मजा…’, ‘ आमचा भोजने पुन्हा हास्यजत्रेत परत आला,’ असे लिहिले आहे.





