पुणे जिल्ह्यात नागरिकांना शीतपेय, आईस्क्रीमचा आधार

भवानीनगर – उन्हाळ्याच्या झळा नागरिकांना बसत असल्याने उन्हापासून थंडावा निर्माण होण्यासाठी नागरिक सध्या शीतपेय किंवा आईस्क्रीमच्या गाड्याचा आधार घेत आहेत.
उन्हाळ्यामध्ये शरीराची लाही लाही होत असताना अनेक नागरिक, लहान मुले, महिला भर दुपारी घरातून बाहेर पडत नाहीत. परंतु शरीराला थंडावा निर्माण होण्यासाठी चौकामध्ये उभा असलेल्या आईस्क्रीमच्या गाड्यांवरून शीतपेय किंवा आईस्क्रीम चा आधार सध्या नागरिक घेत आहेत. या उन्हाळ्याच्या काळामध्ये दरवर्षीपेक्षा आईस्क्रीमच्या गाड्यांची संख्या वाढलेली असून अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम लागले आहे.
अतिशय चांगल्या प्रकारे हा व्यवसाय होत असून या व्यवसायातून कुटुंब चालवण्यासाठी चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न देखील मिळत आहे. साधारण जानेवारीपासून हा व्यवसाय सुरू होत असून मे महिन्याच्या शेवटपर्यंत हा व्यवसाय सुरू राहत असल्याने या पाच महिन्यांमध्ये हे व्यावसायिक चांगल्या प्रकारे व्यवसाय करून आपले कुटुंब चालण्यासाठी पुढील सहा महिन्याची देखील आर्थिक तजवीज करून ठेवत आहेत.
सध्या तरी उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली असल्याने हा आईस्क्रीम किंवा शीतपेचा व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू असल्याचे व्यवसायिकांनी माहिती दिली.





