Accident : बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार
Updated On:

पुणे – भरधाव बसचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार झाला. हा अपघात दोन दिवसांपुर्वी दुपारी साडेबाराच्या सुमारास शिवाजीनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला.
गोविंद गंगाधर गोनारे (वय ३१, रा. मांजरी बुद्रूक) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रदीप नाईक (वय ३५, रा. तळेगाव दाभाडे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास गोंविद हे न्यायालयातील काम उरकवून घराकडे चालले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या बसचालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
त्यामुळे खाली पडल्यामुळे गोविंद गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तपास करीत आहेत.





