पिंपरी | बसच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू
Updated On:

पिंपरी, (प्रतिनिधी) – भरधाव खासगी बसने दुचाकीला चोरात धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. १६) सकाळी सातच्या सुमारास जुना मुंबई पुणे महामार्गावर देहुगाव कमानीसमोर घडली.
याबाबत राजु सिताराम नवघरे (वय ५०, रा. संत तुकारामनगर, येलवाडी, देहुगाव, ता. खेड ) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन खासगी बस (क्र. एमएच १४ एचजी ४१३३) चालकावर गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्याच्या दुचाकीवर एका ३० वर्षीय महिलेसोबत माळवाडी ते देहुरोडकडे जात असताना आरोपी चालवत असलेल्या बसने त्यांच्या दुचाकीला समोरुन जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीच्या पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली, त्यातच तीचा मृत्यू झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक नाले करत आहेत.





