सेल्फीचा नाद पडला महागात …! सेल्फी घेताना दरीत कोसळून महिला ठार
Updated On:

पाचगणी -महाबळेश्वरमध्ये सेल्फी घेताना दरीत कोसळून, अंकिता सुनील शिरसकर (वय 23) ही महिला पर्यटक ठार झाली. ही दुर्घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. तीनशे फूट खोल दरीत महिलेचा मृतदेह आढळला.
याबाबत माहिती अशी, अंकिता व त्यांचे पती दुचाकीवरुन पुण्याहून महाबळेश्वरला पर्यटनाला आले होते. केटस् पॉइंट परिसरातील नीडल होल पॉइंट येथे अंकिता या सेल्फी घेत होत्या.
यावेळी तोल जाऊन त्या दोनशे ते तीनशे फूट खोल दरीत कोसळल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर व सह्याद्री ट्रेकर्सचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्यास सुरुवात केली. अंकिता यांचा मृतदेह दोनशे ते तीनशे फूट खोल दरीत आढळला.





