विजेचा खांब कोसळल्याने शेतात काम करणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू
Updated On:

अकोले – अंगावर विजेचा खांब कोसळल्याने अकोले तालुक्यातील गणोरे येथील अलका नामदेव आंबरे (वय 55) यांचा जागीच दुदैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी साडे चार वाजेच्या सुमारास घडली. तालुक्यातील गणोरे परिसरातील शिंदेवाडी परिसरात शट डाऊन असल्यामुळे बाभळीचे झाड तोडण्याचे काम सुरू होते. मात्र यावेळी बाभळीच्या झाडाची फांदी शेजारी असलेल्या वीज वाहक तारांवर कोसळली.
तारांवर झाडाची फांदी कोसळल्यामुळे तारांना आणि विजेच्या खांबांना मोठा हादरा बसला. त्यामुळे एका लाईनमधील तीन पोल हे एकाच वेळी कोसळले. अलका आंबरे यावेळी आपल्या शेतात काम करीत होत्या. त्यांच्याजवळ देखील एक विजेचा खांब उभा होता. हा पोल थेट अलका आंबरे यांच्या अंगावर कोसळला. पोलचा अंगावर कोसळण्याचा वेग जास्त असल्याने त्यांना जबरदस्त मार लागला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्य झाला.





