Amitabh Bachchan : “श्वेताला बांधून ठेवावं लागायचं”; अमिताभ बच्चन आपल्या मुलीबद्दल असे का म्हणाले?

‘कौन बनेगा करोडपती’ या रियालटी शोच्या माध्यमातून हिंदी सिनेमासृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन हे गेल्या १६ वर्षांपासून या शोचे होस्टिंग करत आहेत. या शोचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. या शोमध्ये अमिताभ बच्चन हे मजेदार आणि रंजक किस्से शेअर करताना दिसतात. नुकताच प्रदर्शित झालेल्या या शोच्या एपिसोडमध्ये त्यांची लेक श्वेता बच्चन हिच्याबद्दल एक किस्सा बिगी बी यांनी शेअर केला आहे.
या शोमध्ये अमिताभ बच्चन हे स्पर्धकांना फक्त प्रश्न विचारत नाहीत, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत त्यांचा प्रवासही समजून घेतात. कधीकधी तर त्यांच्या आयुष्यातील किंवा इतर अनेक मजेशीर किस्सेही अमिताभ हे प्रेक्षकांसोबत शेअर करतात. त्यांच्या भारदस्त आवाजाने तर लाखो चाहते आहेत. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये बच्चन यांनी त्यांची लेक श्वेता हिला इंजेक्शनबद्दल भीती वाटणाऱ्या किस्सा सांगितला.
…अन् सगळ्यांना खळखळून हसू आले
कौन बनेगा करोडपति 16’ या शोमध्ये काही दिवसांपूर्वी आयआयटी दिल्लीचे उत्सव दास हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. त्यांनी अत्यंत शानदारपणे खेळ खेलत 25 लाख रुपये जिंकले. यादरम्यान बिग बींनी मुलीच्या इंजेक्शनच्या भीतीचा किस्सा सांगितला. डॅाक्टरांकडे गेल्यावर लहान मुलांना आणि विशेष करून महिलांना इंजेक्शनची भीती वाटते. बच्चन यांची मुलगी श्वेता हिला देखील इंजक्शनची भीती वाटत होती. त्याचा किस्सा त्यांना सांगितला. मी हे बोलतोय कारण माझी जी लेक आहे श्वेता, तिला इंजेक्शन द्यायचं असेल तर तिला बांधूनच ठेवाव लागतं, नाहीतर इंजेक्शन पाहूनच ती धूम ठोकते, पळून जाते, त्यांचा किस्सा ऐकूण सगळ्यानांच खळखळून हसू आले.





