Rinku Rajguru : रिंकू राजगुरूची खास भेट! वेगळ्या अंदाजातील पहिले अल्बम गाणं चाहत्यांच्या पसंतीस
Rinku Rajguru : माझं पहिलं अल्बम सॉंग असल्याने माझ्यासाठी खास आणि जवळच असल्याची रिंकुची प्रतिक्रिया

Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरूचे मागील काही दिवसांपासून वारी मधील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्याद्वारे तिच्या आगामी प्रोजेक्टची चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर त्याचा आता उलगडा झाला आहे.
सारेगम मराठीने सोशल मीडियावर गाण्याची एक छोटी झलक दाखवली आणि आता सगळेच या गाण्यासाठी उत्सुक आहेत. “बाप विठुराया” अस या गाण्याचं नाव असून अजय गोगावले यांच्या दमदार आवाजात हे गाण बघायला मिळणार आहे. तसेच रिंकूचा कधीही न पाहिलेला वेगळा लुक या गाण्यातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
View this post on Instagram
गाण्याबद्दल बोलताना रिंकू सांगते, “मला खुप आनंद होतोय की की माझं पहिलं अल्बम गाण हे विठ्ठलावर चित्रीत आहे. कारण माझं आणि विठ्ठलाच नातं खुप आधीपासुनच आहे. माझं विठ्ठलावर प्रचंड प्रेम आणि श्रद्धा आहे. विठ्ठल हा माझ्या आयुष्यातील एक हळवा भाग आहे. त्यामुळे हे गाणं करताना मला असं वाटलं की, त्याच्या मनात असावं म्हणून हे सगळं जुळून आलं.
आनंदाची गोष्ट म्हणजे हे गाणं अजय गोगावले यांनी गायलं आहे आणि फार वर्षांनी पुन्हा त्यांच्यासोबत काम करता आलं. सारेगम सोबत ही काम करता आलं याचाही मला खुप आनंद आहे. माझं पहिलं अल्बम सॉंग असल्याने हे माझ्यासाठी खुप खास आणि जवळच आहे. आशा करते की प्रेक्षकांना ही ते तितकंच आवडेल.” तिच्या या पहिल्या अल्बम गाण्यासाठी रिंकूसह चाहतेही देखील तितकीच उत्सुक आहे. सध्या अनेकांकडून रिंकुचे कौतुक होत आहे.
हेही वाचा:




