नवं वर्षानिमित्त प्रभास-तृप्तीच्या चाहत्यांना खास भेट; ‘स्पिरिट’ चित्रपटातील खतरनाक लुक समोर

Spirit first poster | सुपरस्टार अभिनेता प्रभास लवकरच ‘स्पिरिट‘ या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर आलं आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चित्रपटाचं पोस्टर शेअर करत प्रभास-तृप्ती डिमरीने चाहत्यांना अनोखं सरप्राइज दिलं आहे.
या पोस्टरमध्ये प्रभास आणि तृप्ती डिमरी यांना यापूर्वी कधीही न पाहिलेल्या दमदार अवतारात दाखवण्यात आले आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या मागील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘अॅनिमल’ प्रमाणेच ‘स्पिरिट’चे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, त्याची घोषणा देखील नव्या वर्षाच्या मध्यरात्री झाली होती.
‘स्पिरिट’मध्ये प्रभास लांब केस आणि दाढी-मिशी असलेला त्याचा लूक आहे. पोस्टरमध्ये अभिनेत्याच्या एका हातात दारूचा ग्लास आहे, तर दुसरा हात त्याच्या कमरेवर आहे. तर तृप्ती डिमरी शांतपणे त्यांची सिगारेट पेटवत आहे. या दमदार लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. Spirit first poster |
View this post on Instagram
दीपिका पादुकोणची चित्रपटातून एक्झिट
गेल्या वर्षभरापासून संदीप रेड्डी वांगा यांचा स्पिरिट या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. अभिनेत्री दीपिका पादुकोणची चित्रपटातून एक्झिट झाल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं होतं. त्याची अनेक कारणेही समोर आली होती. दीपिकाच्या एक्झिटनंतर सिनेमात प्रभास सोबत तृप्ती डिमरीची जोडी जमली आहे. Spirit first poster |
‘स्पिरिट’ ही प्रभास आणि संदीप रेड्डी वांगाची एकत्र पहिली फिल्म आहे, जी भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. खास बाब म्हणजे या चित्रपटात प्रभास आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच पोलिस अधिकारीाची भूमिका करणार आहेत. या चित्रपटात विवेक ओबेरॉय, प्रकाश राज आणि कांचना यांच्यासह अनेक कलाकार आहेत. Spirit first poster |
हेही वाचा:
निवडणुकीपूर्वीच मोठा झटका! ‘या’ महानगरपालिकेतील शिंदेंच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद





