Tripi Dimri : स्पिरिटमध्ये अॅनिमल फेम अभिनेत्रीची एन्ट्री; प्रभाससोबत दिसणार मुख्य भूमिकेत

Tripi Dimri : अॅनिमल चित्रपटामुळे चर्चेत आलेले दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा हे त्यांच्या स्पिरिट चित्रपटाला घेऊन उत्सुक आहेत. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत असून, अभिनेत्री दीपिका पादुकोण त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार असल्याची बातमी आली होती. मात्र, नुकतीच दीपिकाने स्पिरिटमधून एक्झिट घेतली असून, तिच्या जागी आता नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. या अभिनेत्रीने स्वतः तिच्या इन्स्टा अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे.
स्पिरिट हा प्रभासचा आगामी बहुचर्चित चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अॅनिमल, कबीर सिंग चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे संदीप रेड्डी वांगा हे करणार आहेत. तर टी सिरीज बॅनरखाली भूषण कुमार या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. प्रभासच्या करिअरमधला अत्यंत महत्वाचा म्हणून स्पिरिट चित्रपटाकडे पाहिले जात आहे. आता प्रभाससोबत बॅालीवूडमधील अभिनेत्री तृप्ती डिमरी हि स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटातील तृप्तीच्या भूमिकेबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. पण ती या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रभास स्पिरीटमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिका साकारणार आहे. जो भ्रष्टाचार आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीविरुद्ध संघर्ष करण्यासाठी रणनिती तयार करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2026 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. स्पिरीटमधून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर प्रभासला कमबॅक करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे त्याचे चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.





