Nashik News : नाशिकमधून खळबळ उडवून देणारा प्रकार समोर! पोलिसांना टॅबमध्ये आढळले 200 तसले व्हिडिओ, नेमकं काय घडलं?

Nashik News : भोंदू बाबा अशोक खरातचे प्रकरण ताजे असतानाच आता नाशिकमधून आणखी एक खळबळ उडवून देणारा प्रकार समोर आला आहे.

Updated On:
Nashik News : नाशिकमधून खळबळ उडवून देणारा प्रकार समोर! पोलिसांना टॅबमध्ये आढळले 200 तसले व्हिडिओ, नेमकं काय घडलं?

Nashik News : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातचे प्रकरण राज्यभरात गाजत असतानाच आता आणखी एक सँक्डल उघडकीस आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हे काय चाललंय असा प्रश्न सर्वसामन्य नागरिकांना पडला आहे.

सातपूरमधील एका बड्या व्यावसायिकाला मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल 12 लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी चार संशयितांना सातपूर पोलिसांना ताब्यात घेतले आहे. तक्रारदार व्यावसायिकाची पण चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या एका बड्या व्यावसायिकाचा टॅब ऑफिसमधून चोरीला गेला आणि त्यानंतर 200 आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आले आहेत. त्याच्या मैत्रिणीसोबतचे हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी चोरी करणाऱ्यांनी दिली. त्यानंतर हा खळबळ उडवून देणार प्रकार समोर आला आहे. हे चारही जण व्यावसायिकाला मैत्रिणीसोबतचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याला ब्लॅकमेल करत होते.

पोलिसांनी सापळा रचला अन्…

या प्रकरणाची माहिती पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचला. ब्लॅकमेलींगचा दहा हजार रुपयांचा पहिला हफ्ता घेताना पोलिसांनी चार जणांना पकडले.

पोलिसांनी आरोपींकडून टॅब जप्त केले. त्या टॅबमध्ये तब्बल दीडशे ते दोनशे आक्षेपार्ह खासगी व्हिडीओ पोलिसांना आढळून आल्याने पोलिस चक्रावून गेले. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, चौकशी सुरू आहे.

आकाश बकरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई, श्रीपत शिंदे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत. अशोक खरातने अनेक महिलांचं लैंगिक शोषण प्रकरणाने महाराष्ट्र हादरला असतानाच आता या खळबळ उडवून देणाऱ्या प्रकाराने महाराष्ट्र हादरला आहे.

हेही वाचा : Vikrant Massey: वॉशरूमबाहेर मिळालेल्या संधीने बदललं आयुष्य; विक्रांत मॅसीचा संघर्षातून यशाकडे प्रवास

आणखी संबंधित बातम्या

Raj Thackeray : "बेसावध राहू नका, पायाखालची जमीन सरकली ना..."; राज ठाकरेंचा मोठा इशारा, फडणवीसांना कडक शब्दांत सुनावलं

2026-07-09 13:25:37

Raj Thackeray : "बेसावध राहू नका, पायाखालची जमीन सरकली ना..."; राज ठाकरेंचा मोठा इशारा, फडणवीसांना कडक शब्दांत सुनावलं

Sanjay Raut : "शरद पवारांची कृती शिवसेनेला दुखावणारी"; शिंदेंच्या दालनातील बैठकीवर संजय राऊतांची थेट प्रतिक्रिया

2026-07-09 11:59:23

Sanjay Raut : "शरद पवारांची कृती शिवसेनेला दुखावणारी"; शिंदेंच्या दालनातील बैठकीवर संजय राऊतांची थेट प्रतिक्रिया

Sharad Pawar : 34 वर्षांनी विधानभवात एन्ट्री; एकनाथ शिंदेच्या दालनात जाऊन भेट, पवारांनी नेमका कोणता संदेश दिला?

2026-07-09 11:06:16

Sharad Pawar : 34 वर्षांनी विधानभवात एन्ट्री; एकनाथ शिंदेच्या दालनात जाऊन भेट, पवारांनी नेमका कोणता संदेश दिला?

Eknath Khadse : एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंनी घेतलेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण

2026-07-09 10:29:15

Eknath Khadse : एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंनी घेतलेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण

लक्षवेधी : महाराष्ट्राच्या विस्तारणार्‍या क्षमता

2026-07-09 05:30:41

लक्षवेधी : महाराष्ट्राच्या विस्तारणार्‍या क्षमता