Agriculture : कृषी उत्पानदाच्या निर्यातीत मोठी घट

Agriculture – देशातील कृषी उत्पानदाच्या निर्यातीत मोठी घट झाली असून मागील महिन्यात २७.९४ लाख टनांवरून सप्टेंबर महिन्यात घसरून १७.९३ लाख टनावर घसरली आहे, अशी माहिती कृषी-निर्यात प्रोत्साहन संस्था APEDA ने म्हटले आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात कृषी मालाची निर्यात प्रत्येकी ३३ लाख टन होती. तथापि, बासमती विविध जातीसह कांदा निर्यातीवर केंद्र सरकारकडून बंदी घातल्याने शेतमालाची निर्यात सुमारे 18 लाख टनांपर्यंत घसरली.
कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) ने दिलेल्या आकडेवारीनुसार, 2023-24 आर्थिक वर्षाच्या ऑगस्टमध्ये कृषी उत्पादनांची निर्यात 27.94 लाख टन होती. मात्र, या आर्थिक वर्षातील ऑगस्टमध्ये ती 18,128 कोटी रुपयांवर घसरली आहे.
देशातून सप्टेंबरमध्ये बहुतांशपणे गैर-बासमती तांदळाची निर्यात होते. परंतु, केंद्र सरकारने देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी आणि अन्नधान्य महागाई रोखण्यासाठी बासमती तांदळावर किमान निर्यात मूल्य लागू केल्यामुळे कृषी मालाच्या निर्यातीला यंदा मोठा फटका बसला आहे.





