Sanjay Shirsat : “पब्लिसिटीसाठी हवा करण्याचा मोर्चा”; संजय शिरसाट यांची ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चावर टीका
या गर्जना मोर्चावरून शिदेंसेनेचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुंबईतल्या मोर्चा पेक्षा दोन भाऊ एकत्र येतात याची चर्चा आहे, पब्लिसिटीसाठी टी-शर्ट घालून हवा करण्याचा मोर्चा आहे,

Sanjay Shirsat – मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत गर्जना मोर्चा काढला.
या गर्जना मोर्चावरून शिदेंसेनेचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुंबईतल्या मोर्चा पेक्षा दोन भाऊ एकत्र येतात याची चर्चा आहे, पब्लिसिटीसाठी टी-शर्ट घालून हवा करण्याचा मोर्चा आहे, असे म्हणत ठाकरे बंधूंची खिल्ली उडवली.
ज्ञानेश कुमार यांचा विरोधातला मोर्चा म्हणताय, एकातरी पक्षाने सहकार्य केले का तुम्हाला? बरे नेतृत्व कोणाचे उद्धवचे की राजचे हेही सांगा?’ असा सवालही शिरसाट यांनी केला.
शिरसाट म्हणाले, ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा हा पब्लिसिटी स्टंट आहे. आज मुंबईत जो मोर्चा निघतोय त्यापेक्षा दोन भाऊ एकत्र येतायत, याचीच चर्चा आहे. टी-शर्ट घालून हवा करण्याचा मोर्चा आहे. हे अर्धा किलोमीटर चालणार आणि मोर्चा यशस्वी झाला, असे दाखवणार.
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातला मोर्चा आहे, असे म्हणत आहात, एकतरी पक्षाने सहकार्य केले का?, असे शिरसाट म्हणाले. हा इव्हेंट आहे, याला फार प्रतिसाद मिळणार नाही. टी-शर्ट वाटून काढलेला हा मोर्चा आहे. कसली गर्जना? हातात हात घालून फोटो काढण्याचा हा मोर्चा.
मग जंतर-मंतरवर जा. चलो दिल्ली म्हणा. राष्ट्रवादी(शप) अध्यक्ष शरद पवार किंवा अजून कोणाचा पाठिंबा? कुणी त्यांचे लोक गेले का? असा सवालही शिरसाट यांनी केला. सीजेपीला यांनीच विरोध केला होता.
स्वतःचे सक्सेस दाखवायला की, आजची अस्तित्वाची लढाई आहे. मागणी करताना योग्य करावी, ज्ञानेश कुमार बाबत मागणी योग्य असेल तर त्याचा विचार केंद्र सरकार करेल, असेही ते म्हणाले.





