A.R. Rahman – भारतातील सुप्रसिद्ध संगीतकार ‘ए. आर. रहमान’ यांच्या बद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे. त्यांना चेन्नईतील ग्रीम्स रोड इथल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यातत आलं आहे. रविवारी सकाळी त्यांना छातीत दुखू लागल्यानंतर तातडीने चेन्नईतल्या रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्या काही चाचण्या केल्या असून छातीत दुखत असल्याने रेहमान यांची ईसीजी आणि इकोकार्डिग्राम चाचणीसुद्धा करण्यात आली. ए. आर. रेहमान यांच्या टीमकडून अद्याप त्यांच्या प्रकृतीविषयी कोणतीही अपडेट समोर आली नाही. मात्र, सोशल मीडियावर त्यांच्या बाबत अनेक बातम्या व्हायरल होत आहे. रहमान यांनी वयाच्या ११व्या वर्षी आपला मित्र शिवमणीसोबत बॅन्ड रूट्ससाठी कि-बोर्ड वाजवण्यास सुरूवात केली आणि त्यांच्या संगीतमय प्रवासाला सुरूवात झाली. १९९२ सालापासून त्यांनी आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये मंत्रमुग्ध करून टाकणारे संगीत देऊन जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. रोजा, बॉम्बे, रंगीला, दिल से, लगान, रंग दे बसंती हे त्यांनी संगीत दिलेले काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. २००८ साली प्रदर्शित झालेल्या स्लमडॉग मिलेनियर या इंग्रजी चित्रपटाच्या संगीतासाठी ए. आर. रहमानाला यांना ऑस्कर, गोल्डन ग्लोब व बाफ्टा पुरस्कार मिळाले आहेत.