Cocktail 2 Box Office : दमदार ओपनिंग! पहिल्याच दिवशी मोडला जुन्या ‘कॅाकटेल’चा विक्रम, किती कमाई केली?
Cocktail 2 Box Office : सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अहवालानुसार, 'कॉकटेल 2'ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे 13.50 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे.

Cocktail 2 Box Office : शाहिद कपूर, कृती सेनन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतीक्षित रोमँटिक ड्रामा ‘कॉकटेल 2’ हा चित्रपट 19 जून रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘मैं वापस आऊंगा’, ‘गव्हर्नर’ आणि ‘भारत भाग्य विधाता’ यांसारख्या चित्रपटांच्या प्रदर्शनानंतर अवघ्या आठवडाभरात आलेल्या ‘कॉकटेल 2’ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूडमधील रोमँटिक चित्रपटांना अलीकडच्या काळात अपेक्षित यश मिळाले नसताना या चित्रपटाने मात्र पहिल्याच दिवशी बॅाक्स अॅाफिसवर दमदार कामगिरी केली आहे. (Cocktail 2 Box Office)
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अहवालानुसार, ‘कॉकटेल 2’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे 13.50 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. अधिकृत आकडेवारी जाहीर झाल्यानंतर या संख्येत थोडाफार बदल होऊ शकतो.
हेही वाचा : Revati Sule Wedding : सुप्रिया सुळेंची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीचे फोटो समोर…
या कमाईसह ‘कॉकटेल 2’ने 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या सैफ अली खान, दीपिका पदुकोण आणि डायना पेंटी यांच्या ‘कॉकटेल’ चित्रपटाचा पहिल्या दिवसाच्या कमाईचा विक्रमही मोडला आहे. मूळ ‘कॉकटेल’ने भारतात 10.47 कोटी रुपयांची ओपनिंग घेतली होती.

Cocktail 2 Box Office : दमदार ओपनिंग! पहिल्याच दिवशी मोडला जुन्या ‘कॅाकटेल’चा विक्रम, किती कमाई केली?
याशिवाय, ‘कॉकटेल 2’ हा 2026 मधील चौथा सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या शाहिद कपूरच्या ‘ओ रोमिओ’ या चित्रपटाच्या 9.01 कोटी रुपयांच्या ओपनिंगचा विक्रमही या चित्रपटाने मागे टाकला आहे. (Cocktail 2 Box Office)
पहिल्याच दिवशी मिळालेल्या दमदार प्रतिसादामुळे येत्या आठवड्यात ‘कॉकटेल 2’च्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील काही एडल्ट सीनमुळे नेटकऱ्यांकडून टीका केली जात आहे.
हेही वाचा : Khan Sir Case: खान सरांना न्यायालयाकडून दिलासा! पुढील सुनावणीपर्यंत अटकेला स्थगिती





