Rashmika Mandanna: एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या बायोपिकमध्ये रश्मिका मंदाना झळकणार?
Rashmika Mandanna या बायोपिकचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरी करणार आहेत. त्यांनी यापूर्वी ‘जर्सी’सारखा गाजलेला चित्रपट दिग्दर्शित केला होता. एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या जीवनावरील हा चित्रपट वास्तवदर्शी आणि प्रभावी बनवण्यासाठी ते गेल्या काही काळापासून सखोल संशोधन करत असल्याचे सांगितले जात आहे.

Rashmika Mandanna : भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक गौतम तिन्ननुरी करणार असून, मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचे नाव आघाडीवर असल्याचे वृत्त समोर आले आहे.
काही माध्यमांच्या अहवालानुसार, एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या भूमिकेसाठी रश्मिका मंदाना यांची निवड करण्यात आली आहे. यासाठी नुकतीच त्यांच्या घरी लूक टेस्टही घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या चित्रपटात त्या महान गायिकेची भूमिका साकारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, या भूमिकेसाठी यापूर्वी इतर अभिनेत्रींचीही नावे चर्चेत होती. सुरुवातीला साई पल्लवी यांचे नाव पुढे आले होते. त्यांनी या भूमिकेची तयारी म्हणून कर्नाटक संगीताचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केल्याची माहितीही समोर आली होती. त्यानंतर रुक्मिणी वसंत यांची निवड झाल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. त्यामुळे मुख्य भूमिकेसाठी नेमकी कोणाची निवड झाली आहे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. (Rashmika Mandanna)

Rashmika Mandanna
विशेष म्हणजे, चित्रपट निर्मात्यांकडून किंवा दिग्दर्शकांकडून अद्याप कोणत्याही अभिनेत्रीच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांना अंतिम घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Rashmika Mandanna)
या बायोपिकचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरी करणार आहेत. त्यांनी यापूर्वी ‘जर्सी’सारखा गाजलेला चित्रपट दिग्दर्शित केला होता. एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या जीवनावरील हा चित्रपट वास्तवदर्शी आणि प्रभावी बनवण्यासाठी ते गेल्या काही काळापासून सखोल संशोधन करत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, रश्मिका मंदाना तिच्या आगामी ‘कॉकटेल २’ या चित्रपटामुळेही चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलरला मिळालेल्या प्रेमाबद्दल रश्मिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले आहेत.
‘कॉकटेल २’ हा चित्रपट १९ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. होमी अदजानिया दिग्दर्शित या चित्रपटात शाहिद कपूर, कृती सेनन आणि रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. आता एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका कोण साकारणार, याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.





