Khan Sir Case: खान सरांना न्यायालयाकडून दिलासा! पुढील सुनावणीपर्यंत अटकेला स्थगिती
Khan Sir Case: २५ जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत त्यांच्या अटकेवरील बंदी कायम

Khan Sir Case: शिक्षक खान सर उर्फ फैजल खान यांना बिहारमधील पाटणा येथील कोचिंग वाद आणि गोळीबार प्रकरणात न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांच्या अटकेवरील बंदी कायम ठेवली आहे. खान सर यांच्या तीन सहकाऱ्यांच्या अटकेलाही स्थगिती देण्यात आली आहे.
२५ जून रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत त्यांच्या अटकेवरील बंदी कायम राहणार आहे. या कालावधीत त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक किंवा अटकेची कारवाई पोलिसांना करता येणार नाही. न्यायालयाने पोलिसांना पुढील सुनावणीपर्यंत खान सर यांच्याविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच, पोलिसांनी अपडेटेड केस डायरीही न्यायालयात सादर केली आहे. यापूर्वी पोलिसांच्या डायरीतून खान सरांच्या सुरक्षारक्षकांनी दहशत पसरवण्यासाठी गोळ्या झाडल्याचा गंभीर आरोप समोर आला होता. (Khan Sir Case)
मात्र, आज कोर्टाने दोन्ही बाजूंचा विचार करत खान सरांसह त्यांच्या बाजूच्या इतर लोकांनाही दिलासा दिला आहे. पुढील आदेशापर्यंत पोलिसांनी कोणतीही दबावतंत्राची किंवा बळाचा वापर करून कारवाई करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालय २३ जूनपर्यंत या केस डायरीचे वाचन आणि अभ्यास करणार असून, २५ जून रोजी या प्रकरणावर अंतिम आणि सविस्तर सुनावणी होण्याची दाट शक्यता आहे. तोपर्यंत खान सरांच्या अटकेवरील स्थगिती कायम राहणार आहे.
खान सरांचे वकील अरविंद कुमार यांनी सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, “कोचिंग वादाशी संबंधित या प्रकरणात खान सर यांना न्यायालयाकडून सातत्याने दिलासा मिळत आहे. पोलिसांनी आज केस डायरी कोर्टात जमा केली आहे. आता न्यायालय या डायरीचा सखोल अभ्यास करेल.”
खान सर यांच्यावर आरोप (Khan Sir Case)
दरम्यान, सरकारी वकील राजेश कुमार यांनी असेही म्हटले की, खान सर यांच्यावरही आधीपासून एक गुन्हा दाखल आहे आणि त्यांनी यापूर्वीही कायदा व सुव्यवस्था बिघडवली आहे. यावर खान सर यांच्या वतीने अधिवक्ता अरविंद कुमार मौआर यांनी, ते आंदोलनशी संबंधित प्रकरण होते. ते कोणत्याही गुन्ह्यात सामील नव्हते आणि त्या प्रकरणाचा निकाल आधीच लागला असल्याचे सांगितले. (Khan Sir Case)
हेही वाचा:



