Odisha News | ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील एका दगडखाणीत भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे खाणीचा भाग कोसळला असून अनेक मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गोपाळपूर गावाजवळील एका बेकायदेशीर खाणीत हा स्फोट झाला. स्फोटानंतर खाणीतील मातीचा काही भाग कोसळल्याचा दावा केला जात आहे. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या या स्फोटात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही खाण अनधिकृतपणे चालवली जात होती. या स्फोटामुळे परिसरातील बेकायदेशीर खाणींबद्दलही चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिसर सुरक्षित केला. तसेच लोकांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तहसीलदार आणि मोटांगा पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रात्रभरापासून घटनास्थळी आहेत. Odisha News | बचाव आणि मदत कार्य सुरू समोर आलेल्या माहितीनुसार, ढेंकनाल जिल्हा खाण कार्यालयाने यापूर्वी 8 सप्टेंबर 2025 ला भाडेपट्टेदाराला ब्लास्टिंगची परवानगी नसल्याचे कारण देत एक निर्देश जारी केले होते. तरीही, नियमांचे उल्लंघन करून साइटवर ब्लास्टिंग सुरूच होते. रात्री उशिरा ही घटना घडल्याने कामगारांना शोध घेणे कठीण झालं होतं. सध्या घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. मुखमंत्री नवीन पटनायककडून दुःख व्यक्त या दुर्घटनेवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते नवीन पटनायक यांनी दुःख व्यक्त केले आहे. पटनायक यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून, मजुरांच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस पावले उचलाण्याचे आवाहनही केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटले की, “ढेंकनाल खाण दुर्घटनेची बातमी ऐकून दुःख झाले आहे. यात अनेक मजुरांनी आपला जीव गमावल्याचे समजत आहे. पीडित कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे.” Odisha News | हेही वाचा: “मुलुंडचे ना*** पोपटलाल बिनविरोध..”; राऊतांची सोमय्यांवर आक्षेपार्ह शब्दांत टीका; म्हणाले “मुंबईवर…”