koyana dharan: कोयना धरणाच्या पाणीवाटपात मोठा बदल?
koyana dharan कोयना धरणाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती केली जाते. त्याचबरोबर कृष्णा खोर्यातील शेतीच्या सिंचनासाठीही कोयनेच्या पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वीजनिर्मिती आणि सिंचन या गरजांमध्ये नव्याने संतुलन साधण्याचा प्रयत्न या निर्णयातून दिसत आहे. सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळावे, अशी अनेक भागांमधील शेतकर्यांना अपेक्षा आहे. वीजनिर्मितीसाठी पाणीवापरात कपात करुन, सिंचनाचा वाटा वाढवण्याचा निर्णय झाल्यास, शेतीसाठी अधिक पाणी उपलब्धत होऊ शकेल.

koyana dharan: कोयना धरणातील पाण्याचा वापर आणि वाटपाबाबत नव्याने धोरणात्मक विचार सुरू झाला आहे. वीजनिर्मितीसाठी दिल्या जाणार्या पाणीसाठ्यात कपात करुन, शेतीच्या सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय विधानसभा कामकाज समितीने घेतल्याची माहिती या समितीचे सदस्य आमदार राहुल कुल यांनी दिली. समितीच्या सदस्यांनी कोयना धरण आणि जलविद्युत प्रकल्पाच्या पहिल्या व दुसर्या टप्प्याची पाहणी केली.
आमदार नीलेश राणे, आमदार राहुल कुल, आमदार विलास भुमरे आणि आमदार मिलिंद नार्वेकर हे पाहणी दौर्यात सहभागी झाले होते. धरणातील पाणीसाठा, जलविद्युत निर्मितीची यंत्रणा, प्रकल्पाची कार्यपद्धती आणि पाण्याच्या वापरासंदर्भातील तांत्रिक बाबींची माहिती आमदारांनी घेतली. त्यानंतर कोयनानगर येथे कोयना प्रकल्पाच्या विश्रामगृहात बैठक झाली. या बैठकीनंतर आमदार राहुल कुल यांनी दै. ‘प्रभात’च्या प्रतिनिधीला समितीच्या भूमिकेची माहिती दिली.
कोयना धरणाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती केली जाते. त्याचबरोबर कृष्णा खोर्यातील शेतीच्या सिंचनासाठीही कोयनेच्या पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वीजनिर्मिती आणि सिंचन या गरजांमध्ये नव्याने संतुलन साधण्याचा प्रयत्न या निर्णयातून दिसत आहे. सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळावे, अशी अनेक भागांमधील शेतकर्यांना अपेक्षा आहे. वीजनिर्मितीसाठी पाणीवापरात कपात करुन, सिंचनाचा वाटा वाढवण्याचा निर्णय झाल्यास, शेतीसाठी अधिक पाणी उपलब्धत होऊ शकेल.
मात्र, या बदलामुळे प्रकल्पाच्या वीजनिर्मितीवर किती परिणाम होणार, हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.
वीजनिर्मितीसाठी किती पाणी राखून ठेवायचे, सिंचनासाठी किती पाणी उपलब्ध करायचे आणि बदललेल्या नियोजनाचा लाभ कोणत्या भागांना मिळणार, या प्रश्नांची उत्तरे अंमलबजावणीतून स्पष्ट होतील. त्यासाठी पाणीवापराचे मूल्यमापन आणि नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. विधानसभा कामकाज समितीने केलेल्या पाहणीमुळे कोयना धरणाच्या भविष्यातील पाणीवाटपाचा मुद्दा चर्चेत आला आहे. कोयनेच्या जलसंपत्तीचा उपयोग करताना, राज्याची ऊर्जेची गरज, शेतीचे सिंचन आणि धरणग्रस्तांचे हित यांचा समन्वय साधला जाणार का, हा प्रश्न आहे.





