Salman Khan । बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला असून या बातमीने संपूर्ण फिल्म इंडस्ट्री हादरली आहे. दोन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी येऊन ही घटना घडवून आणल्याचे वृत्त आहे.
View this post on Instagram
आता या आरोपींचे फोटो समोर आले आहे, ज्याबद्दल असे म्हटले जात आहे की त्यात दिसणारे दोन लोक तेच लोक आहेत ज्यांनी सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता.
हे फोटो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे, यामध्ये दोन व्यक्ती दिसत असून दोघांच्या डोक्यावर टोप्या आहे. पुढे चालणाऱ्या व्यक्तीने पांढरे आणि काळे कपडे घातले आहे तर मागे चालणाऱ्या व्यक्तीने लाल टी-शर्ट घातलेला दिसत आहे. ते दोघेही सलमान खानच्या घराबाहेर गोळ्या झाडताना दिसल्याचे सांगण्यात येत आहे. या फोटोच्या आधारे यंत्रणांनी दोघांचा शोध सुरू केला आहे.
सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे आणि हे करणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून पंजाबी गायक सिद्धू मूसवालाची हत्या करणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळी आहे. खुद्द लॉरेन्स बिश्नोईने हे मान्य केले असून आता जे समोर आले आहे ते अधिकच आश्चर्यकारक आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारी ही टोळीही असून याला खुद्द लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोईने दुजोरा दिला आहे.
सोशल मीडियावर दिली होती धमकी
हा फक्त ट्रेलर असून पुढच्या वेळी घरात गोळीबार होणार आहे, अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. अनमोलने सलमान खानला संपवण्याची उघड धमकी दिली आहे.
गेल्या वर्षी सलमान खानला एक ईमेल आला होता ज्यामध्ये त्याला धमकी देण्यात आली होती. याशिवाय सलमान खानचे वडील सलीम खान यांनाही एक पत्र मिळाले होते, ज्यामध्ये ते सलमानला मारणार असल्याचे लिहिले होते. यानंतर सलमान खानला पोलिसांनी सुरक्षा दिली आणि अभिनेत्याने स्वत:साठी बुलेट प्रूफ कार खरेदी केली.