Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना जबर हादरा; रायगडमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Maharashtra Politics : रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यातील राजकीय वैर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

Maharashtra Politics : रायगड जिल्ह्यात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. (Maharashtra Politics)
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मतदारसंघातील शेणवई आदिवासी वाडीतील २०० हून अधिक ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. (Maharashtra Politics)
शेणवईतील पक्षप्रवेशाची रायगडमध्ये चर्चा
शेणवई आदिवासी वाडीतील २०० हून अधिक ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतल्याने परिसरातील राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. सुनील तटकरे यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांचे स्वागत केले. हा पक्षप्रवेश आमदार महेंद्र दळवी यांच्या मतदारसंघात झाल्याने त्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. (Maharashtra Politics)
महायुतीतील मित्रपक्षांमध्ये संघर्ष?
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात विविध राजकीय मुद्द्यांवरून यापूर्वीही मतभेद समोर आले आहेत. पालकमंत्रिपदासह स्थानिक राजकारणातील मतभेदांमुळे दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. (Maharashtra Politics)
Eknath Shinde : “शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त पाठवले १०० टन अन्नधान्य” – एकनाथ शिंदे






