‘लाफ्टर शेफ’च्या सेटवर राहुल वैद्यसोबत घडली मोठी दुर्घटना

Rahul Vaidya | कलर्सवरील रिॲलिटी शो ‘लाफ्टर शेफ’ सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये प्रेक्षकांना कॉमेडी आणि ड्रामाचा डोस मिळत आहे. अनेक टीव्ही कलाकार यात सहभागी होणार आहे. पण याच दरम्यान या शोबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे. अलीकडेच ‘लाफ्टर शेफ’च्या सेटवर अभिनेत्री रीम शेखसोबत एक मोठा अपघात झाला. आता गायक राहुल वैद्यसोबतही दुर्घटना घडली आहे.
‘लाफ्टर शेफ’चा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये राहुल वैद्य हा त्याचा पार्टनर अली गोनीसोबत जेवण बनवत असताना अचानक आगीचा भडका त्याच्या अंगावर आल्याचे दिसते. त्याचवेळी इतर स्पर्धकही इतके घाबरतात की तेही ओरडू लागतात.
राहुलची अशी अवस्था पाहून निया शर्मा आणि जन्नत जुबेरच्या हातून जेवण निसटते. सध्या राहुल ठीक आहे, त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. तो थोडक्यात बचावला. सध्या राहुलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
राहुल वैद्यच्या आधी अभिनेत्री रीम शेख देखील ‘लाफ्टर शेफ’च्या सेटवर अपघाताची शिकार झाली होती. राहुल थोडक्यात बचावला पण रीमच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. रीम शेख स्वयंपाक करत असताना तिच्या चेहऱ्यावर गरम तेलाचे थेंब उडाले, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर खुणा दिसू लागल्या. अलीकडेच, रीमने तिच्या चेहऱ्याची स्थिती लेटेस्ट फोटोद्वारे दाखवली होती.
दरम्यान, लाफ्टर शेफ शोला सध्या खूप पसंती दिली जात आहे. या शोमध्ये अनेक सेलेब्स त्यांच्या स्वयंपाकाचे कौशल्य दाखवतात आणि कॉमेडी करतात जी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. यामुळेच शोला टीआरपीही चांगला मिळत आहे.





