पुणे जिल्हा | कर्मवीरांच्या जिवनावर आधारित जिवंत देखाव

परिंचे, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील परिंचे येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सजवलेल्या रथातून कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. लेझीम व झाज पथकाचे खेळ व कर्मवीरांच्या जिवनावर आधारित जिवंत देखावे मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले.
सकाळी विद्यालयाच्या प्रांगणात स्कूल कमिटीचे सदस्य रवींद्र जाधव, दत्तात्रय राऊत शैला जाधव, सुनील शिंदे ,उल्हास नाना जाधव जाधव ,संभाजी नवले सर यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. श्रीनाथ मंदिराच्या सभागृहात मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कोळी गीते,लोक गिते, देशभक्तीपर गीते तसेच मराठी व हिंदी चित्रपटातील गाणी सादर केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लोक गीताला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविधरंगी कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन, प्रतिभा वळकुंदे, नंदिनी दुधाळ, दत्तात्रय बनकर यांनी तर विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश गोरेगावकर यांनी आभार मानले.





