कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत ‘कुसुम कंपनीस’ भीषण आग
Updated On:
कुरकुंभ – दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहती मधील कुसुम डिसिटिलेशन या कंपनीमध्ये शुक्रवारी (दि. २२) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीचे नेमके कारण अध्याप समजले नाही.
यावेळी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीचे अग्नीशामक बंब दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे शर्यतीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात असल्याने बघ्यांची गर्दी जमली आहे.आग मोठी असल्याने काही क्षणात आगीचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले.
टॅग्स:





