पुण्यातील येवलेवाडीमध्ये काचेच्या कारखान्यात भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू
Updated On:

पुणे : पुण्यातील येवलेवाडी येथून एक मोठी घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका काचेच्या कारखान्यात भीषण अपघात झाला आहे, या अपघातात कारखान्यात काम करणाऱ्या चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात येवलेवाडी भागात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका काचेच्या कारखान्यात माल उतरवला जात होता. यादरम्यान काचा फुटल्याने हा अपघात झाला.
या कामगारांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण चार कामगारांचा मृत्यू झाला तर एक कामगार गंभीर जखमी आहे. या चारही कामगारांचे मृतदेह सध्या ससून रुग्णालयात आहेत.





