पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचा निर्णय पिंपरी – पाच वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वकिलीची प्रॉक्टिस असणाऱ्या वकिलांना लॉकडाऊनच्या काळात अडचण येऊ शकते. त्यामुळे त्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनने घेतला आहे, अशी माहिती अध्यक्ष ऍड. दिनकर बारणे यांनी दिली. “करोना’ या साथीच्या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. त्यामुळे अपवाद वगळता सर्व न्यायालये, महसुली न्यायालये व कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. न्यायालयाचे कामकाज बंद असल्याने बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या वकील बंधू-भगिनींना अडचणी निर्माण झाल्या आहेत. पुणे बार असोसिएशनने वकिलांना अन्नधान्य वाटप योजना आखली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे बार असोसिएशनचा आदर्श पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशननेही घेतला आहे. माध्यमातून आपत्कालीन निधी उभारून त्यामधून एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट्स बार असोसिएशनचे पाच वर्षाचे आतील कोर्ट प्रॅक्टिस असलेल्या व पात्रता निकषांमध्ये बसणाऱ्या, गरजू सभासद ज्युनिअर वकील बंधू-भगिनींना मदत स्वरूपात देण्यात येणार असल्याचे ऍड. दिनकर बारणे यांनी सांगितले. यासाठी पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट्स बार असोसिएशनच्या सर्व सभासदांना संघटनेच्या वतीने मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी किमान रक्कम पाच हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम या मदत निधीसाठी द्यावी. आपण देत असलेली मदत खालील नाव व अकाउंट नंबरवर रुपये ट्रान्स्फर करावे, असे आवाहन ऍड. बारणे यांनी केले आहे. Benefishiary Name: INDRAYANI CO-OPERATIVE BANK LTD. PIMPRI. Benefishiry’s Bank: HDFC BANK IFSC NO: HDFC0CICBLP (0=zero) Account no..: 002001000007621 वरील खात्यावर फक्त ” NEFT” द्वारे पैसे पाठवावेत. तसेच NEFT/IMPS अथवा”गूगल पे” करिता खालील बॅंक खात्याचा उपयोग करावा. Befishiary Name: INDRAYANI CO-OPERATIVE BANK LTD. PIMPRI. Benefishiry’s Bank: AXIS BANK LTD. Branch: Pimpri- Chinchwad IFSC NO: UTIB0000103 Account no..: 103010200005173 खात्यात पैसे पाठविल्यानंतर 9822863909 या क्रमांकावर आलेली बॅंकेची पावती पाठवावी, असे आवाहन ऍड. दिनकर बारणे यांनी केले आहे.