हवेत असतानाच वैमानिकाला ‘हर्टअटॅक’; बांगलादेशी विमानाचं नागपुरात ‘एमर्जन्सी लँडिंग’

नागपूर – अनेकदा वाहनचालकांना वाहन चालवत असताना हृदयविकाराचा धक्का बसल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र वैमानिकांना हृदयविकाराचा धक्का बसण्याच्या घटना तशा दुर्मिळच. अफागानिस्तानच्या विमानातील वैमानिकासोबत अशीच घटना घडली. त्यामुळे या विमानाचं नागपूरमध्ये आपात्कालीन लँडीग करण्यात आलं.
ओमानची राजधानी मस्कटहून ढाका येथे जाणाऱ्या बांगलादेशी विमनाच्या वैमानिकाला विमान हवेत असतानाच हृदयविकाराचा धक्का बसला. त्यामुळे या विमानाचं तातडीने नागपूर विमानतळावर लँडींग करण्यात आलं.
दरम्यान घटनेचं गांभीर्य लक्षात घेत विमानातील दुसऱ्या वैमानिकाने कोलकाता एटीसीशी संपर्क साधला असता, त्यांना जवळच्या विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याची परवानगी देण्यात आली होती. या विमानासाठी नागपूर हे विमानतळं सर्वात जवळ होतं. त्यानंतर नागपूरमध्ये हे विमान उतरविण्यात आलं. फ्लाईट ट्रँकींग ऍप वरील आकडेवारीनुसार, संबंधित विमान बोईंग 737-8 असल्याची माहिती समोर आली. या घटनेसंदर्भात अधिक तपशील समोर आलेला नाही.
सध्या ढाका ते कोलकाता दरम्यान आठवड्यातून तीन उड्डाणं सुरू करण्यात आली आहेत. तर ढाका-दिल्ली या हवाई मार्गावर दोन उड्डाणं चालवली जात असल्याची माहिती बुधवारी बांग्लादेशी विमान प्रशासनाकडून देण्यात आली होती.




