War Updates: इराणमध्ये अमेरिकन फायटर जेट कोसळले; वैमानिकाला जिवंत पकडणाऱ्याला बक्षीस जाहीर
War Updates: इराणने अद्याप वैमानिक सापडल्याचा कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही. बक्षीस जाहीर केल्यामुळे वैमानिक अद्याप फरार असावा किंवा इराणच्या सुरक्षा दलांना सापडलेला नसावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

War Updates: पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आता एका अत्यंत संवेदनशील वळणावर आली आहे. इराणच्या सरकारी टीव्ही चॅनेलने दावा केला आहे की, दक्षिण-पश्चिमी इराणमध्ये अमेरिकेचे एक फायटर जेट कोसळले असून त्यातील वैमानिकाने विमानातून बाहेर उडी मारली आहे. विशेष म्हणजे, इराणने आता आपल्या जनतेला आवाहन केले आहे की, जो कोणी या वैमानिकाला जिवंत पकडून पोलिसांच्या हवाली करेल, त्याला मोठे बक्षीस दिले जाईल.
❗️Local TV in Iran’s Yasuj urges residents: CAPTURE US PILOT ALIVE
Tells locals to SHOOT ANY RESCUE AIRCRAFT
Armed nomads and tribes now reportedly searching crash site https://t.co/XPZF89NMjZ pic.twitter.com/FzjLQ2aqQ8
— RT (@RT_com) April 3, 2026
दाव्यांमधील विसंगती: पकडले की शोध सुरू?
सुरुवातीला इराणकडून असा दावा करण्यात आला होता की, अमेरिकन वैमानिकाला पकडण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर लगेचच स्थानिक चॅनेलने वैमानिकाला शोधून देणाऱ्यास बक्षीस जाहीर केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. इराणच्या अधिकृत प्रसारक संस्थेने (IRIB) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक नकाशा प्रसिद्ध केला असून, त्यानुसार दोन वैमानिकांचा शोध सुरू असल्याचे समजते.
वॉल स्ट्रीट जर्नलचा शिक्कामोर्तब?
प्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्र ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने देखील या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे एक फायटर जेट इराणच्या सीमेत कोसळले असून बेपत्ता क्रू मेंबर्ससाठी शोधमोहीम (Rescue Operation) राबवली जात आहे. या संपूर्ण संघर्षात अमेरिकेचे विमान इराणच्या भूमीवर कोसळण्याची ही पहिलीच घटना आहे.
अमेरिकेची भूमिका: अद्याप मौन –
या खळबळजनक दाव्यावर अमेरिकेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पेंटागन, व्हाईट हाऊस किंवा अमेरिकन लष्कराने या घटनेला दुजोरा दिलेला नाही किंवा नाकारलेलेही नाही. मात्र, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुजची सामुद्रधुनी लवकरच खुली करू, असा इशारा वारंवार दिला आहे.
A region where Iran and the United States have been searching for #two American pilots since this morning. pic.twitter.com/cSCfkQvyaA
— IRIB (Islamic Republic of Iran Broadcasting) (@iribnews_irib) April 3, 2026
जर अमेरिकन वैमानिक खरोखरच इराणच्या ताब्यात सापडला, तर हे युद्ध अधिक भडकू शकते. इराण या वैमानिकाचा वापर अमेरिकेवर दबाव टाकण्यासाठी किंवा हल्ले थांबवण्यासाठी करू शकतो. आपल्या वैमानिकाला सोडवण्यासाठी अमेरिका लष्करी ताकदीचा वापर करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे खाडीतील इतर देशही या युद्धात ओढले जाऊ शकतात. जागतिक स्तरावर अमेरिकेला बॅकफूटवर नेण्यासाठी इराण या घटनेचा वापर करू शकतो.
दरम्यान, इराणने अद्याप वैमानिक सापडल्याचा कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही. बक्षीस जाहीर केल्यामुळे वैमानिक अद्याप फरार असावा किंवा इराणच्या सुरक्षा दलांना सापडलेला नसावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. पश्चिम आशियातील तणाव पाहता, पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.





