Healthy Breakfast: सकाळचा नाश्ता हा दिवसभर शरीराला ऊर्जा देण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. मात्र धावपळीच्या जीवनात अनेकांना सकाळी स्वयंपाकासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे बरेच जण नाश्ता टाळतात किंवा बाहेरचे अनहेल्दी पदार्थ खातात. पण आता फक्त दोनच पदार्थ वापरून काही मिनिटांत चविष्ट आणि हेल्दी नाश्ता तयार करता येतो. विशेष म्हणजे हा नाश्ता मुलांपासून फिटनेसची काळजी घेणाऱ्या लोकांपर्यंत सगळ्यांनाच आवडू शकतो. सध्या सोशल मीडियावर आणि फिटनेस जगतात झटपट तयार होणाऱ्या हेल्दी रेसिपींना मोठी पसंती मिळत आहे. विशेषतः काम करणारे लोक, विद्यार्थी आणि मुलांसाठी कमी वेळात बनणाऱ्या रेसिपी अधिक लोकप्रिय ठरत आहेत. जर घरात फक्त केळं आणि ओट्स असतील, तरीही तुम्ही पौष्टिक नाश्ता सहज बनवू शकता. या रेसिपीमध्ये बनाना पॅनकेक किंवा छोट्या टिक्कीसारखा पदार्थ तयार केला जातो. केळं शरीराला त्वरित ऊर्जा देण्यास मदत करते, तर ओट्स पोट जास्त वेळ भरल्यासारखे ठेवतात. त्यामुळे हा नाश्ता चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो. (Healthy Breakfast) 2 Ingredient Banana Pancake Recipe बनाना पॅनकेकसाठी लागणारे साहित्य (Healthy Breakfast) पिकलेले केळं ओट्स चव वाढवण्यासाठी नंतर मध, ड्रायफ्रूट्स किंवा थोडी दालचिनी पावडर घालू शकता. मात्र मूळ रेसिपी फक्त या दोन पदार्थांपासून तयार होते. बनवण्याची सोपी पद्धत (Healthy Breakfast) सर्वात आधी एका भांड्यात केळं व्यवस्थित मॅश करून घ्या. त्यानंतर त्यात ओट्स मिसळा आणि मिश्रण काही मिनिटं बाजूला ठेवा. त्यामुळे ओट्स थोडे मऊ होतात. आता नॉन-स्टिक पॅन गरम करून त्यावर थोडं मिश्रण घाला. छोटे पॅनकेक किंवा टिक्कीच्या आकारात ते पसरवा. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर शिजवा. ही रेसिपी बनवायला खूप कमी वेळ लागतो. सकाळच्या घाईतही अवघ्या काही मिनिटांत गरमागरम नाश्ता तयार होतो. तसेच यासाठी जास्त साहित्य किंवा मेहनत लागत नाही. त्यामुळे कमी वेळात हेल्दी खायचं असेल तर हा उत्तम पर्याय ठरू शकतो. फिटनेसची काळजी घेणारे लोक, डाएट फॉलो करणारे तरुण आणि मुलांच्या डब्यासाठीही हा पदार्थ चांगला पर्याय मानला जातो. तेलकट आणि बाहेरच्या पदार्थांपेक्षा घरच्या घरी बनवलेला हा नाश्ता आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतो.