Amit Thackeray : “लोकांच्या मतांवर निवडून आलेलं सरकार असं चालत नसतं,” आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने अमित ठाकरेंनी व्यक्त केला संताप
Amit Thackeray : लाजा वाटल्या पाहिजेत या सरकारला - अमित ठाकरे

Amit Thackeray : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत कॅाकरोच जनता पार्टीने पुकारलेल्या ‘चलो संसद’ आंदोलनामुळे मोठा तणाव निर्माण झाला. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारोंच्या संख्येने तरुणांनी संसदेकडे धाव घेतली.
आंदोलकांना रोखताना पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसे नेते अमित ठाकरे यांनी देखील सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत ‘लाजा वाटल्या पाहिजेत या सरकारला’ असे म्हणत टीका केली आहे. (Amit Thackeray)
अमित ठाकरेंची पोस्ट – (Amit Thackeray)
अमित ठाकरे (Amit Thackeray ) “लोकांच्या मतांवर निवडून आलेलं सरकार असं चालत नसतं,” आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने अमित ठाकरेंनी व्यक्त केला संताप यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, “२० हून अधिक विद्यार्थ्यांचा जीव घेणाऱ्या शिक्षण व्यवस्थेविरोधात शांततेत प्रश्न विचारणाऱ्या मुलांवर तुम्ही लाठ्या चालवल्यात? बंदुका दाखवून त्यांना अडवलंत? १५-१५ वर्षांच्या मुलांची डोकी फोडली? अश्रूधूर सोडला? सत्तेची ही कसली मस्ती आलीये सरकारला? देशात लोकशाही उरलीये की निव्वळ दडपशाही सुरू आहे?
विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणं हा गुन्हा आहे का? त्यासाठी शांतपणे रस्त्यावर उतरलेल्या महिला आंदोलकांवर काल पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी लाठ्या चालवल्या. नाव आणि बॅज नंबर नसलेले जवान आणून तरुणांना अगदी तुडवलं गेलं. सोनम वांगचुक सरांच्या पत्नीशी गैरवर्तन केलं गेलं आणि अनेक तरुणांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आलं. देशात शांतपणे न्याय मागणाऱ्यांची ही अवस्था? ही कसली गुंडगिरी सुरू आहे??? (Amit Thackeray)
पेपर फोडून विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे दलाल तुमच्या राज्यात मोकाट फिरतात, आणि हक्कासाठी लढणाऱ्या या देशाच्या तरुणाला काल तुम्ही बेशुद्ध होईपर्यंत मारलंत? तुमच्याकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं नाहीत म्हणून पोलिसांच्या मागे लपून मुलांची डोके फोडताय? सत्तेचा हा कसला माज?
स्वतःच्या अपयशाची जबाबदारी घेण्याची हिंमत या सरकारमध्ये उरलेली नाही, म्हणूनच असा अमानुष पोलीस बळाचा वापर केला गेला. लोकांच्या मतांवर निवडून आलेलं सरकार असं चालत नसतं. खरंच…लाजा वाटल्या पाहिजेत या सरकारला,” असे म्हणत अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. Amit Thackeray
हेही वाचा:





