Dattatray Bharne : 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाणार! कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा
Dattatray Bharne : आता कर्जमाफीबाबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी घोषणा करत महत्वाची माहिती दिली आहे.

Major announcement regarding loan waivers by Dattatray Bharne : शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. या घोषणेची अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न राज्यातील शेतकऱ्यांना पडला होता. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ शेतकरी कर्जमाफी या नावाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ ३० जूनपर्यंत लाभार्थ्यांना मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
मात्र, त्यानंतर आता ही मुदत पुढे गेली आहे. पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबात माहिती देत लवकरच लाभ मिळणार असल्याचे सूतोवाच दिले होते. आता कर्जमाफीबाबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी घोषणा करत महत्वाची माहिती दिली आहे.
“उद्याच आम्ही कर्जमाफीची प्राथमिक यादी जाहीर करू. अजित पवार यांची जयंती आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे म्हणून उद्याच जाहीर करण्याचा प्रयत्न आहे.” अशी मोठी घोषणा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.
तांत्रिक अडचणी राहिलेल्या नाहीत. आयकर बाबतचा डेटा देखील परवा प्राप्त झाला आहे. त्यामुळे कोणतीच अडचण नाही. ३० जुलैपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जाणार असे देखील कृषीमंत्र्यांनी म्हटलं आहे.
या घोषणामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता पुन्हा ही तारीख हुकणार की खरचं शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सर्वाधिक तक्रारी ‘या’ जिल्ह्यांमधून
कृषीमंत्र्यांनी बोगस बियाणं प्रकरणात कारवाईचा धडाका सुरू असल्याची माहिती देत ११ हजार ५८४ तक्रारी प्राप्त आहेत. ८१ कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सांगितलं. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत महत्वाची माहिती दिली. खरीप २०२५ मध्ये सोयाबीन बियाण्याच्या उगवण क्षमतेवर सर्वाधिक तक्रारी विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यांमधून आल्या आहेत, असे देखील त्यांनी सांगितलं.






