अमिताभ बच्चन यांच्या घरी चक्क ‘सोन्याचे शौचालय’; अभिनेता विजय वर्माने शेअर केलेला फोटो होतोय व्हायरल!

Amitabh Bachchan Golden Toilet : सोशल मीडियावर सध्या एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून नेटिझन्समध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या घराच्या बाथरूममध्ये चक्क ‘गोल्डन टॉयलेट’ (सोन्याचे शौचालय) असल्याची बाब समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता विजय वर्मा याने शेअर केलेल्या एका थ्रोबॅक फोटोमुळे या दाव्याला हवा मिळाली आहे.
विजय वर्माची जुनी आठवण चर्चेत
अभिनेता विजय वर्माने २०१६ या वर्षातील आपल्या काही खास आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले असून त्यातील एका सेल्फीने इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. हा सेल्फी त्याने अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानी बाथरूममध्ये घेतला होता, ज्याच्या बॅकग्राउंडमध्ये चकाकणारे ‘गोल्डन टॉयलेट‘ स्पष्टपणे दिसत आहे.
काय म्हणाला विजय वर्मा?
आपल्या पोस्टमध्ये भावना व्यक्त करताना विजय वर्माने लिहिले की, “२०१६ हे वर्ष माझ्यासाठी मैलाचा दगड ठरले. मला ‘पिंक’ चित्रपटात ‘बिग बी’ आणि शूजित सरकार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. याच काळात मी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांना भेटलो. तसेच बच्चन सरांच्या घरी ‘गोल्डन टॉयलेट’सोबत सेल्फी घेतला. माझे आदर्श इरफान खान यांचीही भेट झाली.”
Vijay Varma shares a selfie of himself with a ‘Golden Toilet’ at Amitabh Bachchan’s househttps://t.co/YKXSeJhP4U#VijayVarma #AmitabhBachchan #GoldenToilet #PinkMovie #BollywoodThrowback #Throwback2016 #ShoojitSircar #SachinTendulkar #IrrfanKhan @MrVijayVarma
— YesPunjab.com (@yespunjab) January 18, 2026
‘पिंक’ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा
विजय वर्माने सांगितले की, शूजित सरकार दिग्दर्शित ‘पिंक’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्याला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. हा चित्रपट त्याच्या अभिनय कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा होता. अमिताभ बच्चन आणि शूजित सरकार यांच्यासोबत काम करणे हा एक मोठा शिकण्याचा अनुभव होता, असेही त्याने नमूद केले.
विजयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो सचिन तेंडुलकर, सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख आणि दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्यासोबत दिसत आहे. मात्र, या सर्व फोटोंमध्ये बच्चन यांच्या घरातील त्या आलिशान बाथरूममधील ‘गोल्डन टॉयलेट’च्या फोटोचीच सर्वाधिक चर्चा रंगली आहे.





