Janai Bhosale : “भावनांचा पूर आला आहे… “; आशा भोसले यांच्या निधनानंतर नात जनाई भोसलेची अत्यंत भावूक पोस्ट
Janai Bhosale : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधानानंतर त्यांची नात जनाई भोसले हिने सोशल मीडियावरुन भावूक पोस्ट शेअर केली आहे.

Janai Bhosale : भारतीय संगीतविश्वातील दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनाने एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. 12 एप्रिल रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. त्या ९२ वर्षांच्या होत्या. सोमवारी त्यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या चाहत्यांनी आणि मान्यवरांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी अनेकांचा अश्रूंचा बांध फुटला. आशा भोसलेय यांच्या जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, विशेषतः त्यांची नात जनाई भोसले (Janai Bhosale) खूपच दुःखात आहे. अंत्यविधीदरम्यान तिचे अश्रू थांबत नव्हते.
आजीच्या निधनानंतर रात्री उशिरा जनाई भोसलेने सोशल मीडियारून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “भावनांचा पूर आला आहे… योग्य वेळी मी नक्की लिहीन,” असे सांगत तिने लोकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “त्या या सन्मानास पात्र होत्या आणि त्या कायम आपल्या हृदयात जिवंत राहतील,” असेही तिने म्हटले आहे. Janai Bhosale
Janai Bhosale : “भावनांचा पूर आला आहे… “; आशा भोसले यांच्या निधनानंतर नात जनाई भोसलेची अत्यंत भावूक पोस्ट
जनाई आणि आशा भोसले यांचे नाते अतिशय घट्ट होते. दोघी अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत असत. आजीच्या निधनामुळे जनाईच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
तिने “अलविदा, माझ्या आयुष्याचे प्रेम” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जनाई भोसले सध्या संगीत क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत असून तिचे ‘केहंदी है’ हे गाणे विशेष गाजले होते.
लवकरच ती द प्राईड ऑफ इंडिया – छत्रपती शिवाजी महाराज या सिनेमातून अभिनय क्षेत्रातही पदार्पण करणार आहे. या दुःखद प्रसंगामुळे जनाई भोसले आणि तिच्या कुटुंबासाठी हा काळ अत्यंत कठीण ठरला आहे. Janai Bhosale
View this post on Instagram
जुनी मुलाखत व्हायरल
दरम्यान, जनाई भोसलेची सोशल मीडियावर एक जुनी मुलाखत व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत तिने तिची आजी आशा भोसले यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या होत्या. “माझं माझ्या आजीवर खूप प्रेम आहे. तिच्याशी माझं खूप घट्ट नातं आहे. मी फक्त तिच्याकडे पाहते आणि कधीकधी मला रडू येतं.” ती पुढे म्हणाली की, ती आपल्या आजीला नेहमी सांगते, “कधीही सोडून जाऊ नकोस. कायम माझ्यासोबत राहा. मी तिला कोणासोबतही वाटून घेऊ शकत नाही. ती फक्त माझी आहे.” Janai Bhosale
हेही वाचा : Skincare Tips: लिंबू- कॉफीने सौंदर्य नाही, होऊ शकतो धोका! चुकीच्या वापरामुळे त्वचेचं नुकसान वाढतंय





